सभापती येनुरकर तर उपसभापती कारमवार
By admin | Published: April 28, 2016 12:48 AM2016-04-28T00:48:25+5:302016-04-28T00:48:25+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज बुधवारी पार पडलेल्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ...
अविरोध निवड : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक
मूल : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज बुधवारी पार पडलेल्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर यांची सभापती तर आकापूर येथील उपसरपंच संदीप कारमवार यांची उपसभापती पदावर अविरोध निवड झाली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाची निवडणूक १० एप्रिल रोजी पार पडली. यामध्ये काँग्रेसचे १५ तर भाजपाचे ३ संचालक निवडून आले होते. आज बुधवारी दुपारी २ वाजता बाजार समितीच्या सभागृहात सभापती, उपसभापती पदाची निवड करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. सभापतीपदासाठी घनश्याम येनुरकर तर उपसभापतीपदासाठी संदीप कारमवार यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कुमरे यांनी घनश्याम येनुरकर यांची सभापतीपदी तर संदीप कारमवार यांची उपसभापती अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
उल्लेखनीय असे की यावेळी बाजार समितीचे अठराही संचालक उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा बुधवारीच येथे आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत, माजी सभापती संजय पाटील मारकवार, राकेश रत्नावार, संचालक राजेंद्र कन्नमवार, धनंजय चिंतावार, प्रशांत बांबोळे, अखिल गांगरेड्डीवार, किशोर घडसे, शांताराम कामडे, रमेश बरडे, आशा वाढई, माजी संचालक पुरुषोत्तम भुरसे, माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार, नगरसेवक महेश हरडे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)