नवरगावमध्ये विद्यार्थ्यांनी केले चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 05:00 AM2019-12-25T05:00:00+5:302019-12-25T05:00:31+5:30

नवरगावमध्ये हायस्कूल व वरिष्ठ महाविद्यालय असून पेंढरी, महादवाडी, केवाडा, वडशी, मोटेगाव आदी परिसरातील विद्यार्थ्यांनी बसचा पास काढला असून ते दररोज येतात. दुपारच्या वेळी शाळेची ५.३० वाजचा सुटते. त्यामुळे या मार्गाने जाणारे सर्व विद्यार्थी रत्नापूर फाट्यावर जमा होतात. मात्र बस कधीच वेळेवर येत नसल्याने त्यांना रात्री उशिरापर्यंत ताटकळत बसावे लागते.

Chakkajam agitation by students in Navargaon | नवरगावमध्ये विद्यार्थ्यांनी केले चक्काजाम आंदोलन

नवरगावमध्ये विद्यार्थ्यांनी केले चक्काजाम आंदोलन

Next
ठळक मुद्देबस उशिरा आल्याने विद्यार्थी संतापले : सिंदेवाही-नवरगाव चिमूर मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे पेंढरी, मोटेगाव, केवाडा, महादवाडी येथून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. दुपारच्या शाळेतील सुटी ५.३० वाजता होते. मात्र चिमूर आगाराच्या बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना रात्री सात वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागते. या त्रासाला कंटाळून सोमवारी रत्नापूर फाट्यावर विद्यार्थी व शिक्षकांनी चक्काजाम आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी सायंकाळी ६ वाजेपर्यंत बस पाठवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नवरगावमध्ये हायस्कूल व वरिष्ठ महाविद्यालय असून पेंढरी, महादवाडी, केवाडा, वडशी, मोटेगाव आदी परिसरातील विद्यार्थ्यांनी बसचा पास काढला असून ते दररोज येतात. दुपारच्या वेळी शाळेची ५.३० वाजचा सुटते. त्यामुळे या मार्गाने जाणारे सर्व विद्यार्थी रत्नापूर फाट्यावर जमा होतात. मात्र बस कधीच वेळेवर येत नसल्याने त्यांना रात्री उशिरापर्यंत ताटकळत बसावे लागते. सिंदेवाही-चिमूर ही बस सायंकाळी ७ नंतर तर कधी उशिरा येते. या नेहमीच्या त्रासाला कटाळून विद्यार्थी आणि शिक्षकांनी सायंकाळी चक्काजाम आंदोलन केले. त्यानंतर सातच्या सुमारास सिंदेवाही-चिमूर बस आली आमि विद्यार्थी आपआपल्या गावाकडे रवाना झाले. या मार्गाने येणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची गावे रस्त्यावर नाहीत. केवाडा, वडशी, महादवाडी येथील विद्यार्थी पेंढरी या गावापर्यंत सायकलने येतात. तिथे सायकल ठेऊन ते बसने येतात. घटनेची दखल घेत संस्थाप्रमुख जयंत बोरकर, मुख्याध्यापक गोकूलदास वाडगुरे आदींनी चिमूर आगार प्रमुखांना निवेदन देऊन बस वेळेवर सोडण्याची मागणी केली.

चिमूर आगारात आजच्या घडीला चालक-वाहक संख्या कमी आहे. त्यामुळे अनेकवेळा वाहकांची डबल ड्युटी लावली जाते. चिमूर - नवरगाव - सिंदेवाही मार्गावर दिवसभरात ४२ फेºया आहे. सोमवारी तांत्रिक अडचणीमुळे चार वाजता जाणारी फेरी उशिरा गेल्याने अडचण निर्माण झाली. यापुढे बसेस वेळेवर सोडण्यात येईल.
- आर.एस. बोधे,
आगार व्यवस्थापक, चिमूर

निवेदन देऊनही उपयोग नाही
चिमूर आगारामध्ये कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहे. उपलब्ध कर्मचाºयांच्या भरोवश्यावर येथे कारभार हाकला जात आहे. त्याचा परिणाम बस फेºयांवर होत आहे. परिणामी प्रवाशांसह विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन रिक्त असलेल्या जागा त्वरित भरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बस उशिरा येत असल्यासंदर्भात अनेकवेळा निवेदन देण्यात आले आहे. मात्र याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Chakkajam agitation by students in Navargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.