घुग्घुस नगर परिषदेच्या मागणीसाठी आज चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:27 AM2020-12-29T04:27:48+5:302020-12-29T04:27:48+5:30

घुग्घुस : घुग्घुसला नगर परिषदेचा दर्जा देण्यासाठी शासनाने अधिसूचना काढली असे असले तरी घुग्घुस ग्राम पंचायत निवडणूकीची प्रक्रिया ...

Chakkajam agitation today for the demand of Ghughhus Municipal Council | घुग्घुस नगर परिषदेच्या मागणीसाठी आज चक्काजाम आंदोलन

घुग्घुस नगर परिषदेच्या मागणीसाठी आज चक्काजाम आंदोलन

Next

घुग्घुस : घुग्घुसला नगर परिषदेचा दर्जा देण्यासाठी शासनाने अधिसूचना काढली असे असले तरी घुग्घुस ग्राम पंचायत निवडणूकीची प्रक्रिया सुरू केली .नगर परिषदेचा दर्जा मिळत नाही तोपर्यत ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द करावी, यासाठी सर्वपक्षीय नगर परिषद स्थापना करण्यात आली असून समितीची एकमताने निवड केली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता घुग्घुसच्या छत्रपती शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

घुग्घुस ग्राम पंचायतीला नगर परिषदेचा दर्जा मिळावा यासाठी मागील २७ वर्षापासून संघर्ष सुरू आहे. त्यामागणीनुसार ३० आगष्टला शासनाने नगर परिषद निर्मिती संदर्भात अधिसूचना काढली. घुग्घुस ग्राम पंचायतचा कार्यकाळ सप्टेंबरला समाप्त झाल्याने राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्राम पंचायतच्या ११ डिसेंबरला निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली. त्यापूर्वी घुग्घुस नगर परिषदेची अधिसूचना पूर्वीच जाहीर केल्याने घुग्घुस ग्राम पंचायतची निवडणूक रद्द करावी, अशी मागणी पुढे आली. मात्र शासनाने मागणीची दखल घेतली नसल्याने सर्वपक्षीय समितीचे गठन केले असून त्याबैठकीत सर्वानुमते येत्या ग्रा.प. निवडणूकीत सहभागी न होण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्या अनुसंघाणे यापूर्वी गुरुवारी घुग्घुस बंदला चांगला प्रतिसात मिळाला. दरम्यान, सोमवारी चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बाॅक्सॉ

तहसीलदारांचा प्रस्ताव धुळकाविला

घुग्घुस : घुग्घुस ग्राम पंचायतच्या होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वपक्षीय नगर परिषद स्थापना समितीने निवडणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय एकमुखाने घेतल्याने खळबळ उडाली. त्या अनुसंघाणे तहसीलदारांनी ग्राम पंचायतच्या आवारात सर्वदलीय समितीची बैठक घेतली. शासनाची भूमिका विषद केली. मात्र बैठकीत उपस्थित समितीच्या सदस्यांनी सर्वानुमते निवडणुकीत भाग न घेण्याचा निर्णयावर ठाम सभेतून समोर आले. त्याप्रमाणे तहसीलदारांनी सभेत व्यक्त केलेल्या भावना शासनापर्यत पोहचविणार असल्याचे सांगितले .

Web Title: Chakkajam agitation today for the demand of Ghughhus Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.