अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:40 AM2021-02-26T04:40:57+5:302021-02-26T04:40:57+5:30
प्रदूषणामुळे नागरिक हैराण चंद्रपूर : भररस्त्यावर कर्णकर्कश हॉर्न वाजवण्यास कायद्याने बंदी आहे. प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या वाहनचालकांविरूद्ध कारवाईची तरतूद करण्यात ...
प्रदूषणामुळे नागरिक हैराण
चंद्रपूर : भररस्त्यावर कर्णकर्कश हॉर्न वाजवण्यास कायद्याने बंदी आहे. प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या वाहनचालकांविरूद्ध कारवाईची तरतूद करण्यात आली असताना या निणर्याची अंमलबजावणी होत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू आहे. जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याशिवाय सध्या बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे कंत्राटदार ट्रकांद्वारे ओव्हरलोड साहित्याची वाहतूक करीत असल्याने याचा फटका रस्त्यांना बसत आहे. याकडे लक्ष देणे गरेजेच आहे.
सरपणासाठी महिला जंगलात
चंद्रपूर : आर्थिकदृष्टया गॅस सिलिंडर परवडणारा नाही. तसेच रॉकेल देणेही शासनाने बंद केल्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश गरीब महिला स्वयंपाकासाठी सरपणाचा वापर करतात. वन्य प्राण्यांच्या दहशतीत महिलांना जंगल व शेतालगत फिरावे लागत आहे. त्यामुळे सिलिंडर तसेच राॅकेलचा पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
उत्पन्नाची मर्यादा वाढवा
चंद्रपूर : बीपीएलचा लाभ २० हजार उत्पन्न मर्यादा असलेल्या नागरिकांना दिला जात आहे, परंतु ग्रामस्थांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ झाली असल्याने, बीपीएल यादीची उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.