कठड्यांअभावी अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:30 AM2021-09-18T04:30:49+5:302021-09-18T04:30:49+5:30
वेगवान वाहनांवर कारवाई करा चंद्रपूर : स्पर्धात्मक युगात अल्पवयीन मुले दुचाकीवर स्वार होऊन सुसाट वेगाने दुचाकी चालवितात. त्यामुळे अपघात ...
वेगवान वाहनांवर कारवाई करा
चंद्रपूर : स्पर्धात्मक युगात अल्पवयीन मुले दुचाकीवर स्वार होऊन सुसाट वेगाने दुचाकी चालवितात. त्यामुळे अपघात होत आहेत. शहरातील वर्दळीच्या मुख्य मार्गावर भरधाव वेगाने वाहन चालविली जातात. त्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागते. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यात्रा स्थळांना सुविधेचा अभाव
चंद्रपूर : जिल्ह्यात चिमूर, कोरपना, राजुरा, सिंदेवाही, गोंडपिपरी आदी तालुक्यांमध्ये काही ठिकाणी यात्रा भरते. मात्र येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. जिल्ह्यातील प्रत्येक यात्रा स्थळांचा विकास करावा, अशी मागणी होत आहे.
लिलावाअभावी वाहने धूळ खात
चंद्रपूर : येथील रामनगर आणि शहर पोलिसांनी विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेली वाहने लिलावाअभावी अद्यापही धूळ खात पडली आहेत. काही वाहने निकामी झाली असून, त्याचे स्पेअरपार्टही बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. या वाहनांचा लिलाव करण्याची मागणी आहे.
बचतगटांना प्रशिक्षणाची द्या
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बचतगटांची स्थापना करण्यात आली आहे. यामाध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. मात्र अद्यापही काही बचतगटांना प्रशिक्षण मिळाले नसल्याने त्यांनी प्रशिक्षणाची गरज आहे.
वस्त्यांमधील बागेकडे दुर्लक्ष
चंद्रपूर : चंद्रपुरातील वस्त्यांमधील प्रशासनाने बागेसाठी जागा आरक्षित केल्या आहेत. ज्या ठिकाणी बाग आहे, त्या बागेकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या बागांचा विकास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
चंद्रपूर : शहरातील अनेक वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरले असून, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नाल्यांची स्वच्छता करून फवारणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रानडुकरांच्या उपद्रवाने शेतकरी वैतागले
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही भागांत रानडुकरांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. पिकांच्या रक्षणासाठी शेतकरी विविध उपाययोजना करीत आहे. वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.