एफडीसीएम कर्मचारी संघटनेतर्फे चंदनसिंह चंदेल यांचा सत्कार
By admin | Published: May 25, 2016 01:32 AM2016-05-25T01:32:56+5:302016-05-25T01:32:56+5:30
महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ कर्मचारी संघटनेच्यावतीने सोमवारी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांचा सत्कार करण्यात आला.
बल्लारपूर : महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ कर्मचारी संघटनेच्यावतीने सोमवारी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांचा सत्कार करण्यात आला.
स्थानिक वनविकास भवनात पार पडलेल्या कार्यक्रमाला उत्तर चंद्रपूर प्रदेशचे महाव्यवस्थापक न्गुल्ली प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमात भाजपाचे जिल्हा अध्यक्ष हरिष शर्मा, भाजपा महिला आघाडी शहर अध्यक्ष रेणुका दुधे, मध्य चांदाचे विभागीय अध्यक्ष पी.आर. दावडा, ेआर.एम. पिसे, वेतन व लेखा अधिकारी बी.व्ही. पाटील यांची उपस्थिती होती.
संघटनेचे कार्याध्यक्ष बी.बी. पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या मुख्य दहा समस्यांचे निवेदन चंदनसिंह चंदेल यांना सादर केले. तसेच प्रास्ताविकातून सर्व मुद्दे व मुद्याच्या अनुषंगाने माहिती त्यांनी दिली. समस्या निकाली काढण्यात याव्या, अशी विनंती संघटनेतर्फे करण्यात आली.
एफडीसीएम लिमीतर्फे एम.एम. न्गुल्ली यांनी संघटनेने मांडलेल्या समस्यांवर आवश्यक ती माहिती दिली व स्थानिक स्तरावरील प्रश्न निकाली काढण्याबाबत आश्वासन दिले. तसेच उत्तर चंद्रपूर प्रदेशचे महाव्यवस्थापक एस.एस. डोळे, विभागीय व्यवस्थापक पी.आर. दावडा यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
चंदनसिंह चंदेल यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर बोलताना ज्या समस्या प्रलंबित आहेत, त्याबाबत व्यवस्थापकीय संचालक व संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्या निकाली काढण्याबाबत सहानुभूतीपूर्वक पुरेपूर प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाला संघटनेचे कार्याध्यक्ष बी.बी. पाटील, सरचिटणीस अशोक तुंगीडवार, उपाध्यक्ष एस.पी. बोबडे, आर.के. वाघमारे, आर.एस. मरस्कोल्हे, कोषाध्यक्ष साहेबराव चापले, सचिव आर.के. टिकले, पी.पी. खुने, आर.पी. बलय्या, पवन दहागावकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. संचालन शिंपाळे, तर आभार मिलिंद सूर्यवंशी यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)