चंद्रलोक क्रिएशन आणि जिजाऊ गार्डन संचालकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:35 AM2021-02-25T04:35:30+5:302021-02-25T04:35:30+5:30
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाने तोंड वर काढले असून, रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला ...
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाने तोंड वर काढले असून, रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, गर्दी टाळण्यासाठी सामूहिक कार्यक्रमांवरही बंद घातली आहे. असे असताना काही नागरिकांकडून नियम पायदळी तुडविले जात आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सक्त पाऊल उचलणे सुरु केले आहे. याचाच एक भाग म्हणून येथील चंद्रलोक क्रिएशन, जिजाऊ गार्डनचे संचालक तसेच कार्यक्रमाच्या आयोजकांकडून दंड वसूल केला आहे. ही कारवाई बुधवारी महसूल प्रशासनाने केली.
कोरोनारुग्ण संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने विविध निर्बंध लावले आहे. कार्यक्रमातील संख्येवरही निर्बंध आणले आहेत. असे असले तरी नागरिक नियम पाळण्याच्या मनस्थितीत नाहीत. कार्यक्रमाप्रसंगी गर्दी असल्यामुळे महसूल प्रशासनाने धाड टाकून बुधवारी येथील चंद्रलोक क्रिएशन तसेच जिजाऊ गार्डनच्या संचालकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये तसेच आयोजकांकडून प्रत्येकी १० हजार अआ ३० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई नायब तहसीलदार राजू धाडे, मंडल अधिकारी अशोक मुसळे, रुपेश चिवंडे यांच्या पथकाने केली. कोरोना नियंत्रणासाठी शासनाने लावून दिलेले नियम नागरिकांनी पाळावे, असे आवाहन नायब तहसीलदार राजू धांडे यांनी केले आहे.