चंद्रपुरात २६८ किलो नकली बर्फी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 09:55 PM2018-11-19T21:55:19+5:302018-11-19T21:55:56+5:30

अन्न आणि औषध विभागाच्या पथकाने आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या नकली बर्फीचा साठा जप्त केला. या कारवाईत तब्बल २६८ किलो नकली बर्फी जप्त करण्यात आली. या कारवाईने नकली बर्फी विकून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मिष्ठान्न विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात असून अशा प्रकाराने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

At Chandrapur, 268 kg of fake Barfi caught | चंद्रपुरात २६८ किलो नकली बर्फी पकडली

चंद्रपुरात २६८ किलो नकली बर्फी पकडली

Next
ठळक मुद्देआरोग्य धोक्यात : अन्न व औषध विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अन्न आणि औषध विभागाच्या पथकाने आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या नकली बर्फीचा साठा जप्त केला. या कारवाईत तब्बल २६८ किलो नकली बर्फी जप्त करण्यात आली. या कारवाईने नकली बर्फी विकून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मिष्ठान्न विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात असून अशा प्रकाराने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
चंद्रपूर शहरातील सपना टॉकीजजवळ मोठ्या प्रमाणात नकली बर्फीचा साठा असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. याआधारे चौकशी केली असता डीएनआर कुरिअर आॅफिससमोर एका गोदामाबाहेर बर्फी ठेवून असल्याचे निदर्शनास आले. ही बर्फी ठेवण्यासाठी विशेष रेफ्रिजरेटरची आवशकता असते. परंतु ही बर्फी उघडयावरच ठेवलेली होती. चौकशीत पुरवठादाराकडे अन्न व औषध विभागाचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. ही बर्फी सावलराम झोइताराम चौधरी याची असून त्याने गुजरातमधून मागविल्याचे सांगितले. या गोरखधंद्यात आणखी काही जणांची नावे पुढे आल्याचे समजते. पथकाने जप्त केलेली २६८ किलो नकली बर्फी जप्त करून नष्ट केली.
मिठाईच्या प्रकारात बर्फीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने अन्य ठिकाणाहून याचा मोठा साठा मागविला जातो. त्यात अनेकदा भेसळ असते. दूध पावडर, डालडा आणि निकृष्ठ दर्जाचे पदार्थ टाकून ही नकली बर्फी तयार केली जाते. मानवी आरोग्यास ती अत्यंत हानिकारक असते. मात्र, नफा कमविण्यासाठी नकली बर्फी मोठ्या प्रमाणात बाहेरुन मागविली जाते. त्यानंतर ती जिल्ह्यातील काही निवडक मिठाई दुकानदारांना पुरविली जाते. यासाठी एक मोठे रॅकेट जिल्ह्यात सक्रीय आहे. अशाच एका रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पथकाला यश आले आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली केकारे, उमप यांनी केली. अन्न आणि औषध विभागाची ही मोठी कारवाई मानली जात असून या कारवाईमुळे जिल्ह्यात नकली बर्फीचा व्यवसाय करणाºया रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.

Web Title: At Chandrapur, 268 kg of fake Barfi caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.