चंद्रपुरात ६० हजार ८५९ नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:35 AM2021-06-09T04:35:43+5:302021-06-09T04:35:43+5:30

चंद्रपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत विविध ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ७ जूनअखेरपर्यंत एकूण ...

In Chandrapur, 60 thousand 859 citizens took the first dose of vaccine | चंद्रपुरात ६० हजार ८५९ नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस

चंद्रपुरात ६० हजार ८५९ नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस

Next

चंद्रपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत विविध ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ७ जूनअखेरपर्यंत एकूण ८२ हजार ८७ जणांनी लसीची पहिली आणि दुसरी मात्रा घेतली. यात ६० हजार ८५९ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार २१ हजार २२८ पात्र लाभार्थ्यांना दुसरा डोसदेखील देण्यात आला आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात १६ जानेवारी २०२१ पासून करण्यात आली. प्रारंभी आरोग्य सेवेतील व्यक्तींना मात्रा देण्यात आली. त्यात ८ हजार ११८ आरोग्य सेवकांना पहिला डोस, तर ४ हजार ७८९ जणांना दुसरा डोस देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या पोलीस, महसूल व इतर अत्यावश्यक सेवेतील ५ हजार ६२७ जणांना पहिला डोस व २ हजार ६३८ जणांना दुसरा डोस देण्यात आला. आरोग्य सेवक व फ्रंटलाईन वर्कर मिळून ९ हजार ११६ नोंदणीकृत लाभार्थ्यांना पहिला व दुसरा असे २१ हजार १७२ जणांना मात्रा देण्यात आली.

तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिक व ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यात आली. आतापर्यंत ३० हजार २४५ ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोस, तर १० हजार १५६ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. तसेच १२ हजार ३३५ व्याधीग्रस्त नागरिकांना पहिला डोस, तर ३६४५ जणांना दुसरा डोस देण्यात आला.

चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत २ मेपासून १८ ते ४४ वयोगातील व्यक्तींना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी ठिकठिकाणी केंद्र निर्धारित करण्यात आले होते. यात ३ हजार ३१ जणांना कोविशिल्ड, तर, १५०३ जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. असे एकूण ४५३३ जणांना पहिला डोस देण्यात आला.

चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत आतापर्यंत ८२ हजार ८७ जणांनी लसीची पहिली आणि दुसरी मात्रा घेतली. यात ६८ हजार ८६५ कोविशिल्ड, तर १३ हजार २२२ जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली.

Web Title: In Chandrapur, 60 thousand 859 citizens took the first dose of vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.