Chandrapur: आठ महिन्यांपासून गुंगारा देणारा सावली पोलिसांच्या जाळ्यात

By परिमल डोहणे | Published: August 26, 2023 03:18 PM2023-08-26T15:18:03+5:302023-08-26T15:18:56+5:30

Chandrapur: दुचाकीला धडक देऊन जखमीला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून कंटेनर घेऊन मागील आठ महिन्यांपासून फरार असलेल्या चालकाला अखेर सावली पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अत्यंत शिताफीने अटक केली.

Chandrapur: A shadow that has been buzzing for eight months is in the police net | Chandrapur: आठ महिन्यांपासून गुंगारा देणारा सावली पोलिसांच्या जाळ्यात

Chandrapur: आठ महिन्यांपासून गुंगारा देणारा सावली पोलिसांच्या जाळ्यात

googlenewsNext

- परिमल डोहाणे
चंद्रपूर - दुचाकीला धडक देऊन जखमीला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून कंटेनर घेऊन मागील आठ महिन्यांपासून फरार असलेल्या चालकाला अखेर सावली पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अत्यंत शिताफीने अटक केली. मड्डी श्रीनिवास गौड हनुमंथु गौड (५६) असे अटकेतील आरोपीचे नाव असून साईराम कॅरिअर्स कंपनीचा कंटेनर एपी २९ टीए ९६६३ क्रमांकाचा ट्रक जप्त केला आहे.

८ जानेवारी २०२३ रोजी खेडी फाट्याजवळ एमएच ३३ ई ३२९१ क्रमाकांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. यामध्ये प्रफुल्ल सुरेश मडावी यांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनास्थळावर कोणतेच पुरावेही आढळून आले नव्हते. दरम्यान सावली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. तसेच जीपीएस लोकेशनचे ॲक्सेस घेतले. तेव्हा एक कंटनेर बाबत पोलिसांना माहिती मिळाली. तेव्हापासून सावली पोलिस त्या कंटेनरच्या माघावर होते. मात्र तो कंटेनर या परिसरात येतच नसल्याचे दिसून येत होते. दरम्यान गुरुवारी रात्री तो कंटेनर महाराष्ट्रात येत असल्याची माहिती सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळाली. त्यांनी लगेच आपली चमू लक्कडकोट बॉर्डरवर पाठवली. यावेळी ती चमू त्या कंटेनरचा पाठलाग करत चंद्रपूरपर्यंत आले. दरम्यान ते कंटेनर गडचिरोलीकडे जाताच सावली पोलिसांनी खेडी जवळ नाकाबंदी केली. यावेळी कंटेनर येताच कंटेनरसह त्या चालकाला अटक करण्यात आली. ही कारवाई सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनात सावली पोलिसांनी केली.

Web Title: Chandrapur: A shadow that has been buzzing for eight months is in the police net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.