चंद्रपूरचा कलावंत गिनीजसह जागतिक पाच पुरस्कारांचा मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 09:34 PM2021-06-16T21:34:56+5:302021-06-16T21:37:52+5:30

Chandrapur news ऑनलाईन पेंटिंग अपलोड या जागतिक स्पर्धेत चंद्रपुरातील प्रतिभावंत कलावंत व कलाशिक्षक डॉ. सागरकुमार अरुण यम्पलवार यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह जागतिक स्तरावरील पाच पुरस्कारांवर कर्तृत्वाची मोहोर उमटविली.

Chandrapur artist is Guinness World Record holder | चंद्रपूरचा कलावंत गिनीजसह जागतिक पाच पुरस्कारांचा मानकरी

चंद्रपूरचा कलावंत गिनीजसह जागतिक पाच पुरस्कारांचा मानकरी

Next
ठळक मुद्देपेंटिंग अपलोड करण्याचा विक्रमकलावंत विद्यार्थी घडविण्यातही अग्रेसर

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : रेडॉर फाउंडेशनने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी आयोजित

या स्पर्धेत विदेशातील ११२ देशांमधून २०० पेक्षा अधिक, तर भारतातून ९०० कलावंतांनी सहभाग घेतला होता.

रेडॉर फाउंडेशनने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी २ मे २०२१ रोजी संध्याकाळी ७ ते रात्री ८ वाजता फेसबूकवर ऑनलाईन पेंटिंग अपलोड करण्याची स्पर्धा घेतली. स्वत: पेंटिंग करतानाचे छायाचित्र ऑनलाईन फेसबुकवर कसे अपलोड करावे, याचे जागतिक निकष तयार करण्यात आले आहेत. या स्पर्धेत भारतातील २६ राज्यांच्या १८४ शहरांतून ९०० पेक्षा जास्त आणि जगातील ११२ देशांमधून २०० कलावंतांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातून चंद्रपुरातील कलावंत डॉ. सागरकुमार अरुण यम्पलवार यांनीही स्पर्धेत नाव नोंदविले. सहभागी कलावंतांनी एक हजार ४९ पेंटिंग्स ऑनलाईन फेसबुकवर अपडलोड केली. त्यामध्ये डॉ. सागरकुमार यम्पलवार यांचे पेंटिंग अव्वल ठरल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह जागतिक स्तरावरील अन्य पाच पुरस्कारांचा मानकरी ठरले आहेत.


असे होते स्पर्धेचे निकष

एका फेसबुकवर आयडीवरून एकच पेंटिंग अपलोड करणे, पेंटिंग अपलोड करताना हातात केवळ ब्रश असावा, दुसरे कुठलेही डबल टूल्स कलावंतांना वापरता येणार नाही. जागतिक निकषानुसार अपलोड होणारे हे पेंटिंग उत्तम दजार्चेच असावे, यासह अन्य निकषांतही चंद्रपूर येथील डॉ. यम्पलवार यांची कलाकृती पुरस्काराठी पात्र ठरली आहे.

जयपूर येथे चित्रप्रदर्शन
डॉ. यम्पलवार हे बल्लारपूर शहराजवळील बामणी येथील माऊंट पोर्ट स्कूलमध्ये कलाशिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन जयपूर व देशातील अन्य महानगरांमध्येही भरविण्यात आले. जागतिक वॉटरकलर चित्रकला संघटनेचे ते सदस्य असून, राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी आहेत.

जागतिक स्तरावरील अशा प्रकारची ऑनलाईन स्पर्धा कला क्षेत्रात अत्यंत कठीण मानली जाते. अध्यापनाचे कार्य करीत असताना कलेच्या विविध पैलूंचा बारकाईने अभ्यास केला. त्यामुळे या पुरस्कारांचा मानकरी ठरू शकतो. चित्रकलेत मुले कुठेही कमी पडू नयेत, यासाठी मी पुन्हा परिश्रम घेणार आहे.
- डॉ. सागरकुमार अरुण यम्पलवार, पुरस्कारविजेता, चंद्रपूर

Web Title: Chandrapur artist is Guinness World Record holder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :artकला