निर्बंध शिथिल झाल्याच्या आदेशाची चंद्रपूरला प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:26 AM2021-08-01T04:26:16+5:302021-08-01T04:26:16+5:30
चंद्रपूर : राज्यातील २५ जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याचे राज्य शासनाने जाहीर केले. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचाही समावेश असावा, असे ...
चंद्रपूर : राज्यातील २५ जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याचे राज्य शासनाने जाहीर केले. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचाही समावेश असावा, असे जिल्ह्यातील नागरिकांना वाटत आहे. मात्र याबाबतचा शासनाचा आदेश अद्यापही जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचा निर्बंध शिथिल झालेल्या २५ जिल्ह्यांमध्ये समावेश आहे वा नाही. ही बाब रहस्यमय बनली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. काही बोटावर मोजण्याइतकेच रुग्ण आढळत आहे. यामुळे निर्बंध शिथिल व्हावे, अशी मनोमन इच्छा जिल्हावासीयांची आहे. सोबतच व्यापारी संघटनांकडून अशी मागणी सातत्याने केली जात आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या निर्बंधामुळे सकाळी ७ ते दुपारी ४ वाजतापर्यंतच आस्थापना सुरू आहे. यात शिथिलता मिळते वा नाही याकडे चंद्रपूर जिल्हावासीयांचे लक्ष लागलेले आहे.
कोट
राज्यातील २५ जिल्ह्यात कोरोना निर्बंधामध्ये शिथिलता मिळणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्याची माहिती येत आहे. याबाबतचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाही. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आटोक्यात आहे. मात्र शासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतरच चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना निर्बंधात शिथिलता आहे ना नाही हे सांगता येईल.
अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर.