पायाभूत प्रकल्पांमुळे चंद्रपूर बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 10:45 PM2018-12-04T22:45:17+5:302018-12-04T22:45:42+5:30

चंद्रपुरात उभ्या राहत असलेल्या मोठमोठ्या पायाभूत सुविधा, रोजगार निर्मितीसाठी उभे होणारे प्रकल्प, मिशन शौर्यसारखे अभिनव प्रयोग सुरू आहेत. यामुळे जिल्हा बदलला. माझ्या पंजाब या राज्यात देखील असाच एखादा नेता असावा, असे गौरवोद्गार प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांनी मंगळवारी काढले.

Chandrapur changed due to the infrastructure projects | पायाभूत प्रकल्पांमुळे चंद्रपूर बदलले

पायाभूत प्रकल्पांमुळे चंद्रपूर बदलले

googlenewsNext
ठळक मुद्देसोनू सूद : पालकमंत्री फुटबॉल चषक वितरण, नागपूरचा संघ विजेता तर चंंद्रपूर उपविजेता

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपुरात उभ्या राहत असलेल्या मोठमोठ्या पायाभूत सुविधा, रोजगार निर्मितीसाठी उभे होणारे प्रकल्प, मिशन शौर्यसारखे अभिनव प्रयोग सुरू आहेत. यामुळे जिल्हा बदलला. माझ्या पंजाब या राज्यात देखील असाच एखादा नेता असावा, असे गौरवोद्गार प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांनी मंगळवारी काढले.
राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकर्त्यांमार्फ त दुगार्पूर शक्तीनगर येथे पालकमंत्री फुटबॉल चषक घेण्यात आली. राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये नागपूरचा संघ विजेता तर चंद्र्रपूरचा संघ उपविजेता ठरला. या संघांना पुरस्कार वितरणासाठी सिने अभिनेता सोनू सूद आले होते.
मंचावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, डब्ल्यूसीएलचे महाव्यवस्थापक आभा सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, रामपाल सिंग आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सोनू सूद यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास कामांचे तोंडभरून कौतुक केले. मी मूळचा पंजाब राज्याचा रहिवासी आहे. मात्र पंजाबमध्येदेखील अशा पद्धतीचा विकास कामाचा झंझावात मला बघायला मिळाला नाही. ना. मुनगंटीवार यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास कामांना बघून मी अतिशय प्रभावीत झालो आहे. मला अतिशय प्रामाणिकपणे याठिकाणी सांगावेसे वाटते की, असा एखादा नेता माझ्या पंजाब प्रांतामध्ये का दिला नाही, असेही अभिनेता सोनू सुद म्हणाले. नागरिकांनी आग्रह केल्याने त्यांनी त्याच्या आगामी चित्रपटातील काही संवादही त्यांनी सादर केले. नागपूर, चंद्रपूर, बल्लारपूर या शहरांशी आपला परिचय असल्याचे सांगत त्यांनी नागपूरशी माझे नाते असल्याचे नमूद केले. अभियांत्रिकीचे शिक्षण नागपुरातच पूर्ण केले. त्यामुळे बल्लारपूरात अनेक मित्र आहेत. हा परिसर आपल्या परिचयाचा आहे. ना. मुनगंटीवार यांनी बोलावल्यास चंद्रपूरला पुन्हा भेट देऊ असेही सोनू सुद यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बांबूपासून बनवलेली तलवार देऊन सोनू सूद यांचे जिल्ह्यातर्फे स्वागत केले. दुर्गापूर येथील शक्ती नगर भागातील समता स्पोर्टिंग क्लबच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या क्लबतर्फे फारुक शेख, श्रीकांत देशमुख, संजय यादव, घनश्याम यादव आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले.
ऊर्जा देणारे शहर-मुनगंटीवार
चंद्रपुरात शहरात आलेल्या प्रत्येक माणसाला येथून ऊर्जा मिळते. शहरातील कोळशामध्ये कर्तृत्वाचे हिरे तयार होतात. आॅपरेशन शौर्यमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करण्याचा केलेल्या भीम पराक्रम केला. सोनू सूद यांना माता महाकालीचे आशीर्वाद प्राप्त होवोत. आगामी काळात त्यांच्या चित्रपट क्षेत्रामध्ये यश मिळो.

Web Title: Chandrapur changed due to the infrastructure projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.