Chandrapur: छोटा मटका सुरक्षित; शरीरावर किरकोळ जखमी, प्रकृती चांगली

By राजेश भोजेकर | Published: November 17, 2023 07:31 PM2023-11-17T19:31:45+5:302023-11-17T19:33:26+5:30

Chandrapur: बजरंग वाघासोबत झालेल्या झुंजीनंतर छोटा मटका दिसेनासा झाला होता. अखेर तो वनविभागाला गवसला आहे. त्यांच्या अंगावर झुंजीतील किरकोळ जखमा असून त्याची प्रकृती चांगली असल्याचे वनविभागाने एका प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले आहे.

Chandrapur: Chota matka safe; Minor injuries on body, good condition | Chandrapur: छोटा मटका सुरक्षित; शरीरावर किरकोळ जखमी, प्रकृती चांगली

Chandrapur: छोटा मटका सुरक्षित; शरीरावर किरकोळ जखमी, प्रकृती चांगली

- राजेश भोजेकर 
चंद्रपूर - बजरंग वाघासोबत झालेल्या झुंजीनंतर छोटा मटका दिसेनासा झाला होता. अखेर तो वनविभागाला गवसला आहे. त्यांच्या अंगावर झुंजीतील किरकोळ जखमा असून त्याची प्रकृती चांगली असल्याचे वनविभागाने एका प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले आहे. छोटा मटका दिसत नसल्यामुळे पर्यटकांमध्ये त्याच्याविषयी चिंतेचे वातावरण होता. आता ही चिंता दूर झाली आहे. त्यांचे छायाचित्रही जारी करण्यात आले आहे.दि. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान वनपरिक्षेत्र चिमूर (प्रादेशिक) परिक्षेत्रातील खडसंगी नियतक्षेत्रातील वहानगाव येथील सुभाष दोडके यांच्या शेतामध्ये टी- १२६ म्हणजेच छोटा मटका आणि टी-४४ म्हणजे बजरंग या दोन वाघांमध्ये जोरदार झुंज झाली होती.

या झुंजीत बजरंग या वाघाचा मृत्यू झाला. यानंतर छोटा मटकाही गंभीर जखमी असावा, असा संशय होता. मात्र तो दिसत नव्हता. अखेर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक व उपसंचालक (बफर) यांच्या आदेशान्वये दि. १५ व १६ नोव्हेंबर रोजी खडसंगी (बफर) वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, यांच्यासोबत क्षेत्र सहाय्यक निमढेला बी. आर. रंगारी, क्षेत्र सहाय्यक आर. जे. गेडाम, खडसंगीचे वनरक्षक जी. एम. हिंगणकर, वनरक्षक निखील बोडे, वनरक्षक संतोष लोखंडे, वनरक्षक चेतन कोटेवार तसेच एसटीपीएफ व पीआरटी कर्मचारी, कुटी मजुर, रोजंदारी मजुर, अलिझंजा व निमढेला निसर्ग पर्यटनगेट वरील गाईड, जिप्सी चालक मालक अशा एकूण ६५ वनकर्मचाऱ्यांनी पायी गस्त केली. बजरंगचा मृत्यू झालेल्या ठिकाणापासून कक्ष क्र. ५७ व कक्ष क्र. ५५5 मध्ये एकूण १५ ट्रॅप कॅमेरे लावून झुंजीमध्ये जखमी झालेला छोटा मटका या वाघाचा शोध घेतला असता या वाघाच्या शरीरावर किरकोळ जखमा असून त्याची प्रकृती चांगल्या अवस्थेत असल्याचे दिसून आल्याने वनविभागाने म्हटले आहे.

Web Title: Chandrapur: Chota matka safe; Minor injuries on body, good condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ