दोन्ही उमेदवारांना समान मते, चंद्रपूरमध्ये ईश्वरचिठ्ठीद्वारे उपमहापौरपदाचा फैसला, अखेरीस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 14:25 IST2026-02-10T13:49:32+5:302026-02-10T14:25:07+5:30

Chandrapur Deputy Mayor Election: चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने जय पराजयाचा फैसला झाल्यानंतर काही वेळातच झालेली उपमहापौरपदाची निवडणूक अधिकच अटीतटीची झाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ३२ अशी समसमान मतं पडली.

Chandrapur Deputy Mayor Election: Both candidates get equal votes, the post of Deputy Mayor in Chandrapur is decided by a divine decree, finally... | दोन्ही उमेदवारांना समान मते, चंद्रपूरमध्ये ईश्वरचिठ्ठीद्वारे उपमहापौरपदाचा फैसला, अखेरीस...

दोन्ही उमेदवारांना समान मते, चंद्रपूरमध्ये ईश्वरचिठ्ठीद्वारे उपमहापौरपदाचा फैसला, अखेरीस...

चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने जय पराजयाचा फैसला झाल्यानंतर काही वेळातच झालेली उपमहापौरपदाची निवडणूक अधिकच अटीतटीची झाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ३२ अशी समसमान मतं पडली. अखेरीस ईश्वरचिठ्ठीद्वारे झालेल्या निर्णयात चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदाची माळ उद्धवसेनेचे प्रशांत दानव यांच्या गळ्यात पडली.

चंद्रपूरमधील महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक अगदी काही तासांवर आली असतानाही येथील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नव्हता. अखेरीस भाजपा आणि उद्धवसेनेनेचे नगरसेवक एकत्र आल्याने येथील समीकरणे पूर्णपणे बदलून गेली. त्यात सुरुवातीला झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या संगीता खांडेकर या ३२ मते घेऊन विजयी झाल्या. तर ३१ मते मिळवणाऱ्या काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार सोनाली महाडूळे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला.  महापौरपदाच्या निवडणुकीवेळी वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले. तर एमआयएमच्या एका नगरसेवकाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने भाजपासाठी विजयाचं गणित जुळवणं सोपं गेलं.

महापौरपदानंतर उपमहापौरपदासाठी झालेली निवडणूक आणखीनच रंगतदार झाली. या निवडणुकीसाठी उद्धवसेनेने प्रशांत दानव यांना उमेदवारी दिली होती. प्रशांत दानव हे आज सकाळीच उद्धवसेनेत आले होते. तर काँग्रेसने मित्रपक्षाच्या पप्पू देशमुख यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, मतदानावेळी दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ३२-३२ मते पडली. समसमान मते पडल्याने टाय झालेल्या या लढतीचा निर्णय लावण्यासाठी अखेरीस ईश्वरचिठ्ठीचा आधार घेण्यात आला. या ईश्वरचिठ्ठीमध्ये उद्धवसेनेचे प्रशांत दानव यांच्या बाजूने कौल लागला आणि ते उपमहापौरपदी विराजमान झाले.  

Web Title : चंद्रपुर उपमहापौर चुनाव टाई, लॉटरी से हुआ फैसला

Web Summary : चंद्रपुर में उपमहापौर चुनाव टाई हुआ; लॉटरी से उद्धव सेना के प्रशांत दानव जीते। भाजपा ने महापौर पद एक वोट से जीता, अन्य दलों की अनुपस्थिति और तटस्थता के कारण। उपमहापौर का फैसला भी लॉटरी से हुआ।

Web Title : Tie in Chandrapur Deputy Mayor Election Resolved by Lottery

Web Summary : Chandrapur's Deputy Mayor election tied; lottery favored Uddhav Sena's Prashant Danav. Earlier, BJP won the Mayor post by one vote due to absentees and neutrality from other parties. The deputy mayorship was also decided through lottery after a tie.