चंद्रपूर जिल्ह्यात एस.टी.च्या ३२ बसेस विजेवर धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:58 AM2021-09-02T04:58:54+5:302021-09-02T04:58:54+5:30

‘रस्ता तेथे एसटी’ असे महामंडळाने जाळे विणले आहे. त्यामुळे महामंडळाला सर्वांत श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखले जाते. परंतु, हे महामंडळ ...

In Chandrapur district, 32 ST buses will run on electricity | चंद्रपूर जिल्ह्यात एस.टी.च्या ३२ बसेस विजेवर धावणार

चंद्रपूर जिल्ह्यात एस.टी.च्या ३२ बसेस विजेवर धावणार

Next

‘रस्ता तेथे एसटी’ असे महामंडळाने जाळे विणले आहे. त्यामुळे महामंडळाला सर्वांत श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखले जाते. परंतु, हे महामंडळ नेहमीच तोट्यात असते. कोरोनामुळे तर महामंडळाला मोठा फटका बसला आहे. त्यातच आता डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे त्यातून सावरण्यासाठी तसेच प्रदूषणविरहित बस चालविण्यासाठी इलेक्ट्रिक बस वापरण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर पुणे, मुंबई, नाशिक येथे हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा प्रयोग सर्वत्र राबविण्यात येणार आहे.

बॉक्स

या मार्गांवर धावणार बसेस

इलेक्ट्रिक बसचीसाधारणत: ३०० किलोमीटर धावण्याची क्षमता राहणार आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत तालुका ते तालुका अशा जवळील ठिकाणी या बस धावणार आहेत. चंद्रपूर-वणी, गडचांदूर, कोरपना, वणी, राजुरा, सावली या रस्त्यासंदर्भातील शेड्यूल देण्यात आले आहेत. या इलेक्ट्रिक बसचा अधिकाधिक वापर करून कमी खर्चात महामंडळाला जास्त उत्पन्न कमवता येणार आहे.

बॉक्स

जिल्ह्याला लागणार आणखी वेळ

महामंडळाने इलेक्ट्रिक बससंदर्भातील बॅटरीसाठी एका कंपनीसोबत करार केला आहे. परिवहन महामंडळाने सर्व आगारांतून इलेक्ट्रिक बससंदर्भात आराखडा मागितला आहे. या बसेस पुणे, नाशिक व मुंबई येथे प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या बसेस पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक बस केव्हा येतील, हे सांगणे निश्चित नाही.

बॉक्स

चार्जिंग स्टेशन उभारणार

इलेक्ट्रिकवर धावणारी लाल परी पेट्रोल व डिझेलपासून मुक्त राहणार आहे. मात्र तिला चालविण्यासाठी बॅटरी चार्ज करावी लागणार आहे. या इलेक्ट्रिक बसची क्षमता ३०० कि.मी. धावण्याची राहणार आहे. त्यामुळे ही बस ज्या मार्गावर धावणार आहे, त्या मार्गावरील आगारांमध्ये चार्जिंग स्टेशन बसविण्यात येणार आहेत; मात्र अद्यापही कुठलेही स्टेशन नियुक्त केलेले नाही.

बॉक्स

खर्चात होणार बचत

राज्य परिवहन महामंडळाचा सर्वाधिक खर्च डिझेलवर होतो. आता डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्या तुलनेत तेथून मिळणारे उत्पन्न हे तुटपुंजे आहे. इलेक्ट्रिक बस सुरू झाल्यास डिझेलवरील खर्च कमी होणार आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनाचे स्पेअर पार्ट फार कमी लागणार आहेत.

कोट

राज्य परिवहन महामंडळाकडून इलेक्ट्रिक बससाठी अहवाल मागविण्यात आला. ३० ते ३४ शेड्युलची माहिती त्यांना पुरविण्यात आली आहे. हे नियोजन प्राथमिक स्वरूपाचे आहे. टप्प्याटप्प्याने या बसेस सुरू होणार आहेत. या बसची ३०० कि.मी अंतर धावण्याची क्षमता राहणार आहे. त्यानुसार चार्जिंग स्टेशन देण्यात येणार आहेत.

- स्मिता सुतावणे, विभाग नियंत्रक, चंद्रपूर

Web Title: In Chandrapur district, 32 ST buses will run on electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.