चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलिच्या कारभाराला कंटाळलेले शेतकरी चढले टॉवरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 04:12 PM2020-06-26T16:12:50+5:302020-06-26T16:19:59+5:30

बल्लारपूर येथील वेकोलिच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून सकाळी सात वाजता टॉवरवर चढून बसण्याचा निर्धार केला व तो अंमलात आणला.

In Chandrapur district, farmers, fed up with WCL's administration, climbed the tower | चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलिच्या कारभाराला कंटाळलेले शेतकरी चढले टॉवरवर

चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलिच्या कारभाराला कंटाळलेले शेतकरी चढले टॉवरवर

Next
ठळक मुद्देलेखी आश्वासनानंतर उतरले खाली

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: बल्लारपूर येथील वेकोलिच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी एक अभिनव आंदोलन केले. या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून सकाळी सात वाजता टॉवरवर चढून बसण्याचा निर्धार केला व तो अंमलात आणला. यात विलास घटे (४५), मारोती माऊलीकर (४५), संजय बेले (४५) यांचा समावेश आहे.
हे शेतकरी टॉवरवर चढल्याचे लक्षात येताच पोलीस प्रशासनाला पाचारण करण्यात आले. वेकोलिचे अधिकारीही घटनास्थळी पोहचले. या शेतकऱ्यांचे करारनामे पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांना लेखी देण्यात आल्यानंतरच त्यांनी आपला टॉवरवर बसण्याचा निर्धार सोडला.
यावेळी वेकोलिचे अधिकारी विजय चन्ने, सूरज ठाकरे, बाळू जुलमे, किशोर कुळे आदी उपस्थित होते.

Web Title: In Chandrapur district, farmers, fed up with WCL's administration, climbed the tower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी