चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वाघाचे चार हल्ले, तिघांचा घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 07:50 PM2021-05-19T19:50:36+5:302021-05-19T19:51:53+5:30

Chandrapur news चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वाघाचे चार हल्ले झाले. यामध्ये वाघाने तिघांचा बळी घेतली तर एकाला जखमी केले.

In Chandrapur district, four tiger attacks took place on the same day, killing three | चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वाघाचे चार हल्ले, तिघांचा घेतला बळी

चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वाघाचे चार हल्ले, तिघांचा घेतला बळी

Next
ठळक मुद्देमृतकांमध्ये दोन महिला व एक पुरुष वनरक्षकालाही केले जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर : जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वाघाचे चार हल्ले झाले. यामध्ये वाघाने तिघांचा बळी घेतली तर एकाला जखमी केले. मृतकांमध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. तर एका वनरक्षकाला वाघाने जखमी केले. या चारही घटना बुधवारी दिवसभरातील आहे. रजनी भालेराव चिकराम (३५) रा. घोटनिंबाळा ता. भद्रावती, सिताबाई गुलाब चौके (५५) रा. कोकेवाडा(पेंढरी) ता. सिंदेवाही व रामा आडकू मारबते (६५) रा. निफंद्रा ता. सावली यांचा वाघाच्या हल्ल्यात घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सावली तालुक्यातील गेवरा येथील वनरक्षक संदीप चुधरी यांना वाघाने हल्ला चढवून जखमी केले.

भद्रावती तालुक्यातील घोटनिंबाळा येथील रजनी चिकराम ही महिला गावातील काही महिलांसह तेंदूपत्ता संकलनासाठी आयुध निर्माणीच्या जंगल परिसरात गेली होती. सकाळी ८ वाजताच्या सुमारास अचानक वाघाने हल्ला चढविला. यावेळी अन्य महिला आक्रोश करीत तेथून पळत सुटल्या. यामध्ये वाघाने रजनीला जागीच ठार केले. भद्रावतीचे वनपरिक्षेत्राधिकारी राठोड व क्षेत्र सहाय्यक एन. व्ही. हनुवते यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दुसरी घटना सिंदेवाही तालुक्यात घडली. कोकेवाडा येथील काही महिलांसह सिताबाई चौके ही महिलाही तेंदूपत्ता संकलनासाठी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपवनक्षेत्रात येत असलेल्या पेंढरी कोके जंगलात सकाळी गेली गेली होती. आठ वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक या महिलेवर हल्ला चढवून जागीच ठार केले. घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही व नवरगाव येथील पोलीस व वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. संचारबंदीत नागरिकांचे रोजगार ठप्प झाल्याने आता नागरिक तेंदूपत्ता संकलनाचे कार्य करीत आहेत; मात्र पाण्याच्या शोधात जंगलातील वन्यप्राणी गावाजवळ येत असल्याने नागरिकांनी जंगल परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

तिसरी घटना सावली तालुक्यातील पाथरी नियतक्षेत्रातील मेहा बिटात कक्ष क्रमांक १५७ मध्ये घडली. निफंद्रा येथील रामा आडकू मारबते हे बकऱ्यांसाठी चारा आणायला सकाळी जंगलात गेले होते. अशातच त्यांचा वाघाने बळी घेतला. ही घटना दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी वसंत कामडी व सावलीचे ठाणेदार सतीश बन्सोड यानी आपल्या ताफ्यासह जावून घटनास्थ‌ळाचा पंचनामा केला. चौथी घटनाही सावली तालुक्यात घडली. मंगळवारी सावली वनपरिक्षेत्रात वाघाने एका महिलेवर हल्ला चढवून गंभीर जखमी केले होते. या घटनेच्या अनुषंगाने बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी वसंत कामडी यांच्यासह पाथरीचे क्षेत्र सहाय्यक कोडापे, पालेबारसाचे वनरक्षक राकेश चौधरी, खानाबादच्या वनरक्षक पाल, पाथरीचे शेंडे व गेवराचे वनरक्षक संदीप चुधरी ही मंडळी वाघाची शोधमोहीम राबविण्यासाठी जंगलात गेले होते. अशातच अचानक वाघाने वनरक्षक चुधरी यांच्यावर हल्ला चढविला. सुदैवाने यातून ते थोडक्यात बचावले. त्यांना सावली ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. या चारही घटनांनी चंद्रपूर जिल्हा पुन्हा एकदा वाघाच्या दहशतीत आला आहे.

सध्या तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू आहे. यामुळे लाॅकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील मजूर वर्गाला रोजगार प्राप्त झाला आहे. मोठ्या प्रमाणावर जंगल शेजारील नागरिक तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जात आहे. मात्र वाघाचे हल्ले वाढले आहेत. यामुळे पुन्हा मानव-वन्यजीव संघर्ष उद्भवण्याची चिन्हे दिसत आहे.

मुंडके धडावेगळे
सावली तालुक्यातील निफंद्रा येथील रामा मारबते यांच्यावर वाघाने केलेला हल्ला थरारक होते. वाघाने हल्ल्यात रामाचे मुंडके धडावेगळे केल्याचे दिसून आले. रामाला मुंडके नसलेला मृतदेह पडून होता.

Web Title: In Chandrapur district, four tiger attacks took place on the same day, killing three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ