चंद्रपूर जिल्ह्यात पट्टेदार वाघांच्या हल्ल्यात इसम जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:29 AM2019-09-26T11:29:16+5:302019-09-26T11:29:39+5:30

सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील पवना (चक) बिटातील कोठा (गुंजेवाही) येथील लालाजी गणू मेश्राम (वय ५५) या इसमावर गुरुवारी सकाळी ७.३०च्या दरम्यान हल्ला चढवून त्याला जखमी केल्याची घटना घडली.

In Chandrapur district, injured in attack by tiger | चंद्रपूर जिल्ह्यात पट्टेदार वाघांच्या हल्ल्यात इसम जखमी

चंद्रपूर जिल्ह्यात पट्टेदार वाघांच्या हल्ल्यात इसम जखमी

Next
ठळक मुद्देझुडूपात धरला होता दबा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील पवना (चक) बिटातील कोठा (गुंजेवाही) येथील लालाजी गणू मेश्राम (वय ५५) या इसमावर गुरुवारी सकाळी ७.३०च्या दरम्यान हल्ला चढवून त्याला जखमी केल्याची घटना घडली. आपल्या शेतामध्ये खत टाकण्यासाठी हा इसम गेला असता झुडूपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्याच्यावर हल्ला चढवला. त्याने वाघाला परतवून लावण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र वाघाने त्याच्या डाव्या हाताला व पाठीवर पंजे मारून त्याला जखमी केले. हा हल्ला होत असताना केलेल्या आरडाओरड्याला ऐकून जवळपासचे लोक तेथे धावून आले व त्यांनी वाघाला पिटाळून लावले.
लालाजी मेश्रामला तात्काळ गुंजेवाहीच्या प्राथमिक केंद्रात आणले व तेथून त्याला सिंदेवाहीला पाठवण्यात आले.

Web Title: In Chandrapur district, injured in attack by tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ