चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल @ ८३.५५

By admin | Published: May 26, 2016 01:56 AM2016-05-26T01:56:58+5:302016-05-26T01:56:58+5:30

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी ‘आॅन लाईन’ घोषित करण्यात आला.

Chandrapur district result @ 83.55 | चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल @ ८३.५५

चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल @ ८३.५५

Next

यंदाही मारली मुलींनीच बाजी : गतवर्षीच्या तुलनेत निकालात जिल्ह्याची घसरण
चंद्रपूर : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी ‘आॅन लाईन’ घोषित करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ८३.५५ इतकी आहे. २७ हजार ९११ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी २७ हजार ८७६ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यात २३ हजार २९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मागील वर्षी बारावीचा ९२ टक्के निकाल लागला होता. त्यातुलनेत यंदा निकालात जिल्ह्याची घसरण झाल्याचे दिसून येते. चंद्रपूर तालुक्याचा निकाल सर्वाधिक ८८.७५ टक्के लागला आहे. तर पोंभूर्णा तालुक्याचा निकाल सर्वात कमी ७०.६८ टक्के लागला. गतवर्षी ग्रामीण विद्यार्थ्यांनी शहरी विद्यार्थ्यांवर मात केली होती. यंदा तालुकानिहाय निकालाची टक्केवारी बघितल्यास शहरी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी निकालात सरशी घेतल्याचे दिसून येते. भद्रावती वगळता चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी वरोरा, राजुरा या शहरीभागातील विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण टक्केवारी ग्रामीण तालुक्यांच्या तुलनेत वाढविली आहे.
विज्ञान शाखेतून ९ हजार ६५७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ९ हजार ६४८ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात ९ हजार ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९३.६६ इतकी आहे. यामध्ये ४०८ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, २ हजार १५५ प्रथम, ५ हजार ९६९ द्वितीय, तर ५०४ विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.
कला शाखेतून १४ हजार ५४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १४ हजार ५३० विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात ११ हजार १७८ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ७६.९३ इतकी आहे.
यामध्ये २०२ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, ३ हजार १२ प्रथम, ७ हजार १७३ द्वितीय तर ७९१ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
वाणिज्य शाखेतून एकूण २ हजार ७७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसासाठी नोंदणी केली होती. पैकी २ हजार ७५ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात १ हजार ७९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
वाणिज्य शाखेच्या निकालाची टक्केवारी ८६.२७ इतकी आहे. यामध्ये ११८ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, ५७६ प्रथम, ९३० द्वितीय तर १६६ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. एमसीव्हीसी शाखेतून एकूण १ हजार ६२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. पैकी १ हजार ६२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १ हजार २८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
निकालाची टक्केवारी ७९.३० इतकी आहे. २२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यता, ५७० प्रथम, ६९३ द्वितीय तर २ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
(शहर प्रतिनिधी)

निकालात विज्ञान
शाखा अव्वल
यावर्षीच्या बारावीच्या निकालात विज्ञान शाखेचा निकाल इतर शाखेच्या तुलनेत अव्वल ठरला आहे. विज्ञान शाखेतून ९ हजार ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९३.६६ इतकी आहे. त्या तुलनेत कला शाखेतून ११ हजार १७८ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ७६.९३ इतकी आहे. वाणिज्य शाखेतून १ हजार ७९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेच्या निकालाची टक्केवारी ८६.२७ इतकी आहे. एमसीव्हीसी शाखेच्या निकालाची टक्केवारी ७९.३० इतकी आहे.

यंदाच्या निकालातही
मुलींचाच बोलबाला
बारावीच्या निकालात यंदाही जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली. मुलींच्या निकालाची टक्केवारी ८६.०५ इतकी असून मुलांच्या निकालाची टक्केवारी ८१.२२ इतकी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण २७ हजार ९११ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये १४ हजार ४४५ मुलांचा तर १३ हजार ४६६ मुलींचा समावेश होता. एकूण २७ हजार ८७६ विद्याथी परीक्षेला सामोरे गेले. यामध्ये १४ हजार ४२३ मुलांचा तर १३ हजार ४५३ मुलींचा समावेश होता. या परीक्षेत २३ हजार २९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ११ हजार ७१५ मुलांनी तर ११ हजार ५७६ मुलींनी बाजी मारली.

कमी टक्के
निकाल देणाऱ्या शाळा
यावर्षीचा निकाल मागील वर्षीच्या तुलनेत पिछाडीवर गेला आहे. मागील वर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांनी ९२ टक्के निकाला दिला होता. त्या तुलनेत यंदा ९ टक्क्यांनी निकाल घसरला आहे. जिल्ह्यातील सिंदेवाही येथील नामदेवराव वडेट्टीवार ज्युनिअर कॉलेज या महाविद्यालयाने ३३.३३ टक्के निकाल दिला आहे. तर संत गजानन महाराज ज्युनिअर कॉलेज, पेंढरी मक्ता या शाळेने ३४.०९ टक्के निकाल दिला.

Web Title: Chandrapur district result @ 83.55

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.