चंद्रपूर जिल्ह्यात १६ लाखांचे सागवान लाकूड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 01:37 PM2020-04-18T13:37:54+5:302020-04-18T13:38:24+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात भिसी उपवनपरिक्षेत्र अंतर्गत टिटवी परिसरात दडवून ठेवलेला १६ लाखांचा अवैध सागवान लाकूड वनाधिकाऱ्यांनी गुरूवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भिसी उपवनपरिक्षेत्र अंतर्गत टिटवी परिसरात दडवून ठेवलेला १६ लाखांचा अवैध सागवान लाकूड वनाधिकाऱ्यांनी गुरूवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जप्त केला. लाकूड दडवून ठेवणाऱ्या अज्ञात आरोपींचा वन विभागाकडून कसून शोध सुरू आहे.
लॉकडाऊन असल्याने सागवान तस्करांनी भिसी उपवन क्षेत्रात सागवन वृक्षतोड करून जामगाव येथील शेतात दडवून ठेवले होते. वनविभागाच्या विशेष पथकाने धाड टाकून १६ लाखांचा सागवान जप्त केला. सदर कारवाई वनरक्षक व्हि. एस. चंदनखेडे, क्षेत्र सहाय्यक वाय. के. दोडके, अमोल झलके, फिरते पथकातील वनरक्षक आर. आर. नरड, के. डी. गायकवाड, जानबा नंदनवार, गजू बुरबांधे, दिवाकर डांगे आदींनी केली.