चंद्रपूर जिल्ह्याला पूराचा वेढा; वर्धा, वैनगंगा व पैनगंगा कोपली, अनेकांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 05:00 AM2022-07-15T05:00:00+5:302022-07-15T05:00:20+5:30

ब्रह्मपुरी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील लाडजपासून पिंपळगाव, अर्हेर, चिखलगाव, भालेश्वर, हरदोली, चिंचोली, पारडगाव, बेटाळा, बोढेगाव, खरकाडा, (पिंपळगाव), नवेगाव, झीलबोडी, बेलगाव, मांगली, किन्ही, जुगनाळा, रणमोचन या सर्व गावांना पुराचा फटका बसला आहे. गांगलवाडी-आवळगाव - मुडझा - व्याहाड मार्ग बंद झाला आहे. असाच पाऊस राहिला तर लाडज हे गावच पाण्याखाली येऊ शकते.

Chandrapur district under flood; Wardha, Wainganga and Panganga Kopli, migration of many | चंद्रपूर जिल्ह्याला पूराचा वेढा; वर्धा, वैनगंगा व पैनगंगा कोपली, अनेकांचे स्थलांतर

चंद्रपूर जिल्ह्याला पूराचा वेढा; वर्धा, वैनगंगा व पैनगंगा कोपली, अनेकांचे स्थलांतर

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, शिरना, इरई, उमा या नद्यांना पूर आल्यामुळे अनेक गावे पुराने वेढल्या गेल्या आहेत. जिल्ह्यात दीड हजारांहून अधिक घरांची पडझड झाली आहे. याशिवाय अनेक मार्ग बंद असल्याने ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दोन दिवसांपासून वर्धा नदीचे पाणी 
- सतत वाढत असल्यामुळे  बल्लारपूर तालुक्यातील ९ मार्ग बंद झाले आहेत. बामणी-राजुरा मार्गावरील वर्धा नदीचे पाणी पुलावरून बामणीपर्यंत एक किलोमीटर दूर आल्याने निर्भय पेट्रोल पंप बंद करावा लागला आहे. बल्लारपूर पोलिसांनी हा मार्गही वाहतुकीसाठी बंद केला आहे. बल्लारपूर-राजुरा, कोठारी-कवडजई, काटवली-बामणी, विसापूर-नांदगाव पोडे, बल्लारपूर-विसापूर, पळसगाव-कवडजई, हडस्ती- चारवट, चारवट- माना-चंद्रपूर, बल्लारपूरकडून वस्ती विभागाकडे जाणारा गोलपुलिया मार्ग बंद झाला आहे. असे असले तरी काही ठिकाणी पर्यायी मार्ग आहेत. वस्ती विभागात वर्धा नदीवरील गणपती घाट पाण्याखाली आला असून नदीचे पाणी विसापूर रस्त्यापर्यंत आले आहे. बल्लारपूर पोलिसांनी बामणी-राजुरा मार्गावर तसेच अनेक ठिकाणी पोलिसांची चमू तैनात केली आहे. बामणी मार्गावर रस्त्याच्या आजूबाजूला दोन किलोमीटरपर्यंत ट्रकची  रांग लागल्याचे गुरूवारी दिवसभर दिसून आले.

ते ट्रकचालक बोटीने सुखरूप
- कोरपना तालुक्यात नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून पैनगंगा नदीचे पाणी विरूर (गाडे), भारोसा, सांगोडा, कारवाई, अंतरगाव, वनोजा, कोडशी (खु.), कोडशी (बु.) या गावापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. भोयगाव नदीवरील पाणी भरोसा बसस्थानकापर्यंत पोहोचल्याने जवळपास दहा ते बारा ट्रक त्या ठिकाणी अडकले होते. बोटीच्या माध्यमातून प्रशासनाने चालकांना बुधवारी रात्री बाहेर काढले. ट्रक त्याच ठिकाणी उभे आहेत. पूरामुळे नुकसान झाले.

डोलारा तलावातील अनेक घरे पाण्यात
- भद्रावती तालुका तथा शहरांमध्ये पावसाने हाहाकार माजवला असून डोलारा तलावातील अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहे. तसेच पिंडोनी तलाव भरून वाहत आहे. घटनास्थळी पाहणी करण्याकरिता आमदार प्रतिभा धानोरकर तसेच नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी भेटी दिल्या असून संबंधित प्रशासन त्याबाबत कार्य करत आहेत. शिवाजीनगर येथील पिंडोनी तलाव, बिजासन तलाव, हनुमान नगर समशानभूमी परिसर, डोलारा तलाव तसेच गुंजाळा या ठिकाणी आमदार प्रतिभा धानोरकर व अनिल धानोरकर यांनी भेटी दिल्या. अनेक ठिकाणी घरात पाणी घुसले.

टोक येथील १०५ जणांचे केले स्थलांतर
- पोंभुर्णा तालुक्यातील दोन नदीच्या मधात वसलेल्या टोक येथील १०५ जणांना प्रशासनाने पूर परिस्थितीचा विचार करता खबरदारी म्हणून स्थलांतर केले असून त्यांची चेक ठाणेवासना येथील जिल्हा परिषद शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावे प्रभावित
- ब्रह्मपुरी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील लाडजपासून पिंपळगाव, अर्हेर, चिखलगाव, भालेश्वर, हरदोली, चिंचोली, पारडगाव, बेटाळा, बोढेगाव, खरकाडा, (पिंपळगाव), नवेगाव, झीलबोडी, बेलगाव, मांगली, किन्ही, जुगनाळा, रणमोचन या सर्व गावांना पुराचा फटका बसला आहे. गांगलवाडी-आवळगाव - मुडझा - व्याहाड मार्ग बंद झाला आहे. असाच पाऊस राहिला तर लाडज हे गावच पाण्याखाली येऊ शकते.

राजुरा तालुक्याला पुराचा तडाखा
- महाराष्ट्र तेलंगणा सीमेलगत राजुरा तालुक्यातील विरूर, धानोरा कविटपेठ, सिंधी, नलफडी, मूर्ती, विहीरगाव, सातरी, चनाखा, कोहपारा, पंचांळा, चुनाळा बामनवाळा, चिंचोली, अंतरगाव, अन्नूर, अमृतगुडा, खांबडा, सिर्शी अआदी गावांना वर्धा नदी पट्ट्यातील व डोंगरगाव सिंचन प्रकल्प पट्ट्यातील केळझर, नवेगाव, भेंडाळा, बेरडी चिंचबोडी, सोनुर्ली, सोंडो, चिचांळा, डोंगरगाव, कोष्टाळा, लकडकोट, घोट्ट्या, रेड्डीगुडा, सुब्बई, इंदिराणगर, थोमापूर, बापुनगर, मुंडीगेट आदी गावालगतच्या शेतातील खरीप पिकाला मोठा फटका बसला असून शेतजमिनीतील कापूस, धान, सोयाबीन व इतर पीक पाण्याखाली गेली आहे. आर्वी- तोहगाव मार्ग पूर्णत: बंद आहे व विरूरवरून तेलंगणाकडे सिरपूर-कागजनगरकडे जाणारा मार्ग चिंचोलीपासून पूर्णत: बंद आहे, विरूर-वरुर मार्ग अधूनमधून बंद पडत आहे. 

चंद्रपूर - अहेरी मार्ग बंद
- वैनगंगा नदीला पूर आल्याने गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या आष्टी पुलावरून पाणी ओसंडून वाहत आहे. अनेक धरणांचे पाणी सोडल्याने गुरुवारी सकाळपासूनच चंद्रपूर-अहेरी मार्ग बंद आहे.

 

Web Title: Chandrapur district under flood; Wardha, Wainganga and Panganga Kopli, migration of many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.