चंद्रपूर जिल्ह्यात दारूच्या बाटल्या भरलेले वाहन उलटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:48 AM2018-06-15T11:48:02+5:302018-06-15T11:48:13+5:30
शंकरपूरजवळ असलेल्या किटाडी टर्निंग पॉईंटवर अवैधरित्या दारूची वाहतूक करणारी पिकअप व्हॅन उलटली. ही घटना दि १४ जूनला रात्री १० वाजता घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शंकरपूरजवळ असलेल्या किटाडी टर्निंग पॉईंटवर अवैधरित्या दारूची वाहतूक करणारी पिकअप व्हॅन उलटली. ही घटना दि १४ जूनला रात्री १० वाजता घडली.
शंकरपूर मार्गे चिमूर ला जात असलेली पिकअप व्हॅन क्र. एम एच ४ वाय ८१४५ देशी दारू घेऊन जात होती वाहन भरधाव वेगाने जात असल्याने किटाळी टर्निंग पॉईंटवर एका झाडाला टक्कर मारून उटली. त्यात असलेला देशी दारूचा साठा अस्ताव्यस्त पसरला. ही घटना परिसरातील जनतेला माहीत होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस कर्मचारी येईपर्यन्त वाहनामधील अर्ध्याहून अधिक माल लोकांनी लंपास केला. पोलिसांनी पंचनामा करून १९८ देशी दारुच्या १९,८०० रुपये किंमतीच्या बाटल्या व ५ लाख रुपये किंमत असलेले वाहन जप्त केले. वृत्त लिहिपर्यंत आरोपीचा शोध लागला नव्हता.
सरकीच्या आत देशी दारू
चंद्रपूर जिल्हा दारूबंदी झाल्याने अवैध दारू विक्रेते नवनवीन कल्पना अंमलात आणीत आहेत. या वाहनात आजूबाजूने व वरती सरकीची पोती ठेवली होती. तर मध्यभागी दारूच्या पेट्या होत्या.