चंद्रपूर जिल्ह्याला अंधश्रद्धेने 'झपाटले'; पुन्हा एक घटना; अख्ख्या कुटुंबाला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 08:24 PM2021-09-04T20:24:54+5:302021-09-04T20:25:39+5:30

चंद्रपूरच्या भिवापूर वाॅर्डातील पडदेमवार या कुटुंबाला काळ्या जादूमुळे कॅन्सर झाला, अशी अंधश्रद्धा बाळगून बेदम मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

Chandrapur district was 'attacked' by superstition; An incident again; The whole family was beaten to death | चंद्रपूर जिल्ह्याला अंधश्रद्धेने 'झपाटले'; पुन्हा एक घटना; अख्ख्या कुटुंबाला बेदम मारहाण

चंद्रपूर जिल्ह्याला अंधश्रद्धेने 'झपाटले'; पुन्हा एक घटना; अख्ख्या कुटुंबाला बेदम मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्दे सहाजणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : जिवती तालुक्यातील वणी (खुर्द) येथे भानामती व नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे जादूटोण्याच्या संशयावरून हातापाय बांधून अमानुष मारहाणीच्या घटनांनी समाजमन सुन्न झाले असताना आता हे भूत चंद्रपुरात शिरले आहे. चंद्रपूरच्या भिवापूर वाॅर्डातील पडदेमवार या कुटुंबाला काळ्या जादूमुळे कॅन्सर झाला, अशी अंधश्रद्धा बाळगून बेदम मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. (Chandrapur district was 'attacked' by superstition; An incident again; The whole family was beaten to death)

याप्रकरणी शहर पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे. राम पडदेमवार, आशालू पडदेमवार, सिंनू रादंडी, नरसिंग पडदेमवार, मदनूबाई रादंडी, रवी आशावर, मंगेश पडदेमवार अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.

चंद्रपूरच्या भिवापूर वॉर्डातील राम पडदेमवार व नारायण पडदेमवार हे दोघे भाऊ शेजारीशेजारी राहतात. राम पडदेमवार हे कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त आहे. आपल्यावर मोठ्या भावानेच काळी जादू केली म्हणूनच कर्करोग झाला असा संशय त्यांच्या कुटुंबीयांना होता. यावरून दोन भावांच्या कुटुंबात नेहमी वाद व्हायचा. मोठाभाऊ नारायण शुक्रवारी सकाळी जवळच्या आरके चौकात टपरीवर चहा पिण्यासाठी गेले असता, राम पडदेमवार यांच्या कुटुंबीयांनी नारायण पडदेमवार यांच्याशी काळी जादू केल्याने कर्करोग झाला म्हणून वाद घातला.

यावेळी आपल्या वडिलांच्या बचावासाठी नारायण यांचा मुलगा आकाश, आरती व पूजा या दोन मुली धावून आल्या. त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेची तक्रार शुक्रवारी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात पूजा पडदेमवार हिने केली. पोलिसांनी लगेच ३(२) महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायदा सह कलम १४३, १४७, १४९, २३२, ५०४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून सहाजणांना अटक केली. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे, पोलीस उपनिरीक्षक चालफुलकर, सुरेंद्र खनके यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे करीत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात जादूटोण्याच्या घटनांची मालिका

- २१ ऑगस्टला जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथे गावकऱ्यांनी आठजणांना भानामतीच्या संशयावरून दोराने खांबाला बांधून अमानुष मारहाण केली. याप्रकरणी ३३ जणांना अटक झाली होती.

- ३१ ऑगस्टला नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे मुलासह आई व बहिणीला गावातील एका कुटुंबाने पाण्याच्या टाकीला बांधून बेदम मारहाण केली. याप्रकरणी सहा आरोपींना अटक केली आहे.

Web Title: Chandrapur district was 'attacked' by superstition; An incident again; The whole family was beaten to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.