चंद्रपूर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८१.६० टक्के

By admin | Published: June 13, 2017 03:34 PM2017-06-13T15:34:58+5:302017-06-13T15:34:58+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८१.६० टक्के लागला.

Chandrapur district's Class X results were 81.60 percent | चंद्रपूर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८१.६० टक्के

चंद्रपूर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८१.६० टक्के

Next

आॅनलाईन लोकमत

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८१.६० टक्के लागला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुली उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८५.२२ तर मुले उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ७८.३६ एवढी आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातून ३ हजार १७९ विद्यार्थी हे विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातून ३२ हजार ५७२ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. यापैकी २६ हजार ५७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात १३ हजार ४६४ मुलांचा तर १३ हजार ११५ मुलींचा समावेश आहे. ९ हजार ५३६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असून ११ हजार २१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर केवळ उत्तीर्ण श्रेणीत २ हजार ८४३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील २८ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून ९ शाळांचा निकाल ४५ टक्क्यांच्या खाली लागला आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यातून ९१.९० टक्के निकाल देत जिवती तालुका अव्वल ठरला असून कोरपना तालुक्याचा सर्वाधिक कमी म्हणजे ७५.७२ टक्के तर चिमूर तालुक्याचा ७७.७५ टक्के निकाल लागला आहे.

Web Title: Chandrapur district's Class X results were 81.60 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.