दुसऱ्या मोहिमेतही एव्हरेस्टवर चंद्र्रपूरचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 10:50 PM2019-06-03T22:50:05+5:302019-06-03T22:50:40+5:30

आदिवासी विद्यार्थ्यांनी जगावेगळे ध्येय बाळगून ओळख निर्माण करावी, या दृष्टिकोनातून आदिवासी विकास विभागाच्या मिशन शौर्य २०१९ अंतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये शिकणाºया ९ विद्यार्थ्यांनी जगातील उंच एव्हरेस्ट शिखर २३ मे २०१९ रोजी सर केले. यामध्ये जिल्ह्यातील सुरज आडे व अंतू कोटनाके यांचा समावेश होता. एव्हरेस्टवीरांचे आज चंद्रपुरात आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सत्कार करण्यात आला.

Chandrapur flag on the Everest in the second expedition | दुसऱ्या मोहिमेतही एव्हरेस्टवर चंद्र्रपूरचा झेंडा

दुसऱ्या मोहिमेतही एव्हरेस्टवर चंद्र्रपूरचा झेंडा

Next
ठळक मुद्देमिशन शौर्य : एव्हरेस्टवीर सूरज आडे, अंतु कोटनाके यांचा जिल्हा प्रशासनाकडून सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आदिवासी विद्यार्थ्यांनी जगावेगळे ध्येय बाळगून ओळख निर्माण करावी, या दृष्टिकोनातून आदिवासी विकास विभागाच्या मिशन शौर्य २०१९ अंतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये शिकणाºया ९ विद्यार्थ्यांनी जगातील उंच एव्हरेस्ट शिखर २३ मे २०१९ रोजी सर केले. यामध्ये जिल्ह्यातील सुरज आडे व अंतू कोटनाके यांचा समावेश होता. एव्हरेस्टवीरांचे आज चंद्रपुरात आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर व चिमूरचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर आदी उपस्थित होते. राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात आदिवासी विकास विभाग व जिल्हा प्रशासनाने मागीलवर्षी मिशन शौर्य मोहीम सुरू केली होती. मिशनच्या पहिल्या मोहिमेत कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, परमेश आडे, मनीषा धुर्वे व विकास सोयाम या पाच विद्यार्थ्यांनी २०१८ च्या मे महिन्यात एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम केला होता. यावर्षी दुसºया मोहिमेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसोबत महाराष्ट्रातील अमरावती, पालघर, धुळे, नाशिक या पाचही जिल्ह्यातील ११ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यातील ९ विद्यार्थ्यांनी मोठ्या परिश्रमाने एव्हरेस्ट शिखर सर करून राज्याचे लक्ष वेधले. जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये शिकणारे सुरज आडे व अंतूबाई कोटनाके यांचाही यात समावेश आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत देवाडा शासकीय आश्रमशाळेत शिकणाºया सुरज आडे याने या मोहिमेत २३ मे २०१९ रोजी पहाटे ३.३५ वाजता एव्हरेस्टवर पहिला झेंडा फडकवला. सुरज हा कोरपना तालुक्यातील रूपापेठ या गावचा रहिवासी आहे. त्याचे १२ वीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. सुरजचे आई-वडील शेतकरी आहे.
शासकीय आश्रम शाळा जिवती शाळेत शिकणारी अंतू कोटनाके हिने पहाटे ४.२० वाजता मोहीम पूर्ण केली. अंतू या मुलीला आई वडील नाहीत. ती आपल्या नातेवाईकांकडे राहते. जिवती तालुक्यातील आसापूर या गावची रहिवासी असून तिचे ११ वीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. या विद्यार्थ्यांना प्रारंभीचे प्रशिक्षण वर्धा येथील ज्ञानभारती कौशल्य विकास केंद्रात त्यानंतर हैदराबाद मधील भोंगिर येथे नंतर दार्जीलिंग तसेच सिक्कीममध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. या दोन्ही विद्यार्थ्यांमुळे जिल्ह्याचा पुन्हा एकदा नावलौकिक वाढला. आज त्यांचे चंद्रपूरमध्ये आगमन होताच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत केले.
आदिवासी शेतकरी मुलाचा पराक्रम
देवाडा शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या सुरज आडे या विद्यार्थ्याने २३ मे २०१९ रोजी पहाटे ३.३५ वाजता एव्हरेस्टवर पहिला झेंडा फडकवला. सुरज हा कोरपना तालुक्यातील रूपापेठ या गावचा रहिवासी असून १२ वीचे शिक्षण पूर्ण झाले. त्याचे आई-वडील शेतकरी आहे.
अंतुचा नातेवाईकांना अभिमान
शासकीय आश्रम शाळा जिवती शाळेत शिकणारी अंतू कोटनाके हिने पहाटे ४.२० वाजता मोहीम पूर्ण केली. अंतूला आई-वडील नाहीत. आपल्या नातेवाईकाकडे ती राहते. जिवती तालुक्यातील आसापूर या गावची रहिवासी असून तिचे ११ वीचे शिक्षण झाले आहे.

Web Title: Chandrapur flag on the Everest in the second expedition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.