चंद्रपूरसह मुंबई, पुणे, नागपुरात यंदा बांबूच्या राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:12 AM2018-08-20T00:12:52+5:302018-08-20T00:13:40+5:30

बहीण-भावाचे नाते घट्ट बांधून ठेवणारा रक्षाबंधन सण तोंडावर आहे. भावासाठी बहीण आधीच राखीचा बेत बांधून ठेवतात. बहिण-भावाच्या पवित्र नात्याला घट्ट बांधण्यासाठी यंदा पहिल्यांदाच बाजारपेठेत अनोख्या म्हणजे बांबूपासून तयार करण्यात आलेल्या राख्या नवे आकर्षण ठरणार आहेत.

Chandrapur, including Mumbai, Pune, Nagpur this year is the bamboo area | चंद्रपूरसह मुंबई, पुणे, नागपुरात यंदा बांबूच्या राख्या

चंद्रपूरसह मुंबई, पुणे, नागपुरात यंदा बांबूच्या राख्या

Next
ठळक मुद्दे५० हजार राख्यांचे उद्दिष्ट : रक्षाबंधनाला चंद्रपूर बीआरटीसीची अनोखी भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बहीण-भावाचे नाते घट्ट बांधून ठेवणारा रक्षाबंधन सण तोंडावर आहे. भावासाठी बहीण आधीच राखीचा बेत बांधून ठेवतात. बहिण-भावाच्या पवित्र नात्याला घट्ट बांधण्यासाठी यंदा पहिल्यांदाच बाजारपेठेत अनोख्या म्हणजे बांबूपासून तयार करण्यात आलेल्या राख्या नवे आकर्षण ठरणार आहेत. यावर्षी या राख्या चंद्रपूरसह मुंबई, पुणे, व नागपूर या महानगरात उपलब्ध होणार आहे. ही यावर्षीच्या रक्षाबंधनाला चंद्रपूर येथील बांबू रिसर्च व ट्रेनिंग सेंटर (बीआरटीसी) कडून आगळीवेगळी भेट ठरणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बांबू उत्पादन होते. बांबूवर आधारित उद्योग असावा. त्यापासून जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील विविध भागात नव्या रोजगाराची निर्मिती व्हावी, या उद्दात्त हेतूने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात चिचपल्ली येथे बांबू रिसर्च व ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली. बांबूपासून घराच्या दिवाणखाण्यापासून तर कार्यालयात शोभून दिसेल अशा वस्तूंची निर्मिती सुरू झाली.
या केंद्राने एक पाऊल पुढे टाकत यावर्षीपासून बांबूपासून चक्क राख्या बनविण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ आणि बांबू रिसर्च व ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून कामही सुरू आहे.
मुंबई, पुणे व नागपुरातून मागणी
बांबूपासून राखी निर्मितीची कल्पनाच नाविण्यपूर्ण होती. ही कल्पना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही आवडली. या राख्यांना राज्यात मोठी मागणी आहे. पहिले वर्ष असल्यामुळे चंद्रपूर, मुंबई, पुणे व नागपूर या महानगरात या राख्या पाठविण्यात येणार असल्याचे बांबू रिसर्च अ‍ॅन्ड ट्रेनिंग सेंटरचे संचालक राहुल पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
वनमंत्र्यांच्या हस्ते राखी लोकार्पण
राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मंगळवारी बल्लारपूर नगर परिषदेतील कार्यक्रमात राखी लोकार्पण समारंभ पार पडला. बचतगटातील महिलांनी ना. मुनगंटीवार यांच्या हस्तकमलावर राखी बांधली. बचत गटातील भगिनींनी बनवलेली राखी खरेदी करावी. पर्यावरणपूरक राखी रक्षाबंधनात वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार संजय धोटे, नगराध्यक्ष हरीश शर्मा, मीना चौधरी, उपविभागीय आधिकारी क्रांती डोंबे, मुख्याधिकारी श्री.विपिन मुदधा, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय आधिकारी नरेश उगेमुगे आदी उपस्थित होते.

Web Title: Chandrapur, including Mumbai, Pune, Nagpur this year is the bamboo area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.