Chandrapur: साश्रुनयनांनी 'त्या' तिघांना देण्यात आली मुखाग्नी, घरी पार्थिव आणताच कुटुंबांनी फोडला हंबरडा

By राजेश भोजेकर | Published: November 20, 2023 07:14 PM2023-11-20T19:14:52+5:302023-11-20T19:15:23+5:30

Chandrapur News: घरातील ज्येष्ठ वडिलांचे अस्थिविसर्जन करण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरचे उपाध्यक्ष गोविंदा पोडे यांचे संपूर्ण कुटुंब व नातेवाईक वर्धा - इराई नदीच्या संगमावर गेले होते.

Chandrapur: Mukhagni was given to 'the' three by Sasrunayan, the family broke the Hambarada as soon as the body was brought home. | Chandrapur: साश्रुनयनांनी 'त्या' तिघांना देण्यात आली मुखाग्नी, घरी पार्थिव आणताच कुटुंबांनी फोडला हंबरडा

Chandrapur: साश्रुनयनांनी 'त्या' तिघांना देण्यात आली मुखाग्नी, घरी पार्थिव आणताच कुटुंबांनी फोडला हंबरडा

चंद्रपूर - घरातील ज्येष्ठ वडिलांचे अस्थिविसर्जन करण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरचे उपाध्यक्ष गोविंदा पोडे यांचे संपूर्ण कुटुंब व नातेवाईक वर्धा - इराई नदीच्या संगमावर गेले होते. तेथे धार्मिक विधी आटपून अखेरच्या टप्प्यात घराकडे परतण्याची तयारी केली जात होती. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. वर्धा नदीच्या खोल पाण्यात एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी व मनाला चटका लावणारी घटना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे गावाजवळ वर्धा - इराई नदीच्या संगमावर रविवारी घडली. ' त्या ' तिघांवर इराई नदीच्या तीरावर साश्रुनयनांनी सोमवारी मुखाग्नी देण्यात आली. हा प्रसंग पाहून अनेकांच्या डोळ्याचे अश्रू थांबत नव्हते.

बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरचे उपसभापती गोविंदा पोडे हे संपूर्ण कुटुंब व नातेवाईकसह मोठे वडील घनश्याम झित्राजी पोडे यांच्या अस्थिविसर्जना करीता गेले असता वर्धा - इराई नदीच्या संगमावरम खोल पाण्यात त्यांचा व त्यांचा मुलगा चैतन्य भाचा गणेश ऊर्फ उज्ज्वल उपरे यांचे दुर्दैवी मृत्यू झाला. त्या तिघांचे पार्थिव जेंव्हा शवविच्छेदन करून घरी आणले होते तेंव्हा मुलगी मृणालीसह कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. हा प्रसंग पाहून अनेकांच्या डोळे पाणावले होते. त्यावेळी अंतिम दर्शनासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारसह अनेक मान्यवरांनी हाजरी लावून त्यां कुटुंबाचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा त्यांच्या अंतविधीला पंचक्रोशीतील जनसागर उसळला होता मोठ्या जड अंतकरणाने गोविंदा पोडे व त्यांचा मुलगा चैतन्य व भाचा उज्जवलवर साश्रुनयनांनी तिघांना चारवट घाटा जवळ मुखाग्नी देण्यात आली.

 पती व मुलाचे शव बघून पत्नी रेणुका झाली नि:शब्द!
विवाह झाल्यावर ती पोडे कुटुंबाची सून म्हणून नांदगाव पोडे येथे नांदायला आली. हळूहळू सर्वांना आपलेसे करून मोठ्या कष्टाने संसाराची जबाबदारी ती पार पाडत होती. शेतात नवऱ्याला साथ देत कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असल्याने पतीनेही राजकीय प्रवासात ग्रामपंचायत सदस्या पासून सरपंच, पं.स. सभापती ते कृ.उ.बा.स. चंद्रपूर संचालक व आता उपसभापतीपर्यंत मजल मारली. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते मोठ्या वडिलांच्या अस्थिविसर्जनात काळाने घात केल्याने पती व मुलाचे शव बघून ती माऊली रेणुका नि:शब्द झाली. संसाराचा आधारस्तंभ व पोटाचा गोळा गेल्याने ती केविलवाणी एकटक बघतच होती. हे बघून अनेकाचे डोळे पाणावले.

अनेक मान्यवरांनी घेतले अंतिम दर्शन
अजातशत्रू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरचे उपसभापती गोविंदा पोडे यांच्या मृत्यूची वार्ता सगळीकडे पसरताच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, सुधाकर अडबाले व सुभाष धोटे, माजी आमदार संजय धोटे, दीपक जयस्वाल, तहसीलदार डॉ. कांचन जगताप, संवर्ग विकास अधिकारी अनिरुद्ध वाळके, देवराव भोंगळे, दिनेश चोखारे, प्रकाश देवतळे, प्राचार्य नरेंद्र बोबडे, सचिन राजूरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, शामकांत थेरे, रामू तिवारी, कृ.उ.बा.स. चंद्रपूरचे सभापती गंगाधर वैद्य, बल्लारपूर भाजपा तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार,भाजपा सरचिटणीस विद्या देवाळकर,सहाय्यक अभियंता वैभव जोशी, घनश्याम मूलचंदाणी, मुरलीधर गौरकार, बामणी उपसरपंच सुभाष ताजने, कामगार नेते चंद्रशेखर पोडे व राजू झोडे आदी उपस्थित होते.

Web Title: Chandrapur: Mukhagni was given to 'the' three by Sasrunayan, the family broke the Hambarada as soon as the body was brought home.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.