खासगी हॉस्टिपल्सच्या अवाजवी बिलांचे चंद्रपूर मनपा करणार ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 09:59 PM2020-09-18T21:59:30+5:302020-09-18T22:00:41+5:30

निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त शुल्क व्यतिरिक्त खासगी रूग्णालये अवाजवी शुल्ककोरोना रूग्णांकडून वसूल करीत आहे. याला आळा घालण्यासाठी चंद्रपूर महानगर पालिका प्रशासनाने राज्य वित्त व लेखा सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

Chandrapur Municipal Corporation will audit the exorbitant bills of private hospitals | खासगी हॉस्टिपल्सच्या अवाजवी बिलांचे चंद्रपूर मनपा करणार ऑडिट

खासगी हॉस्टिपल्सच्या अवाजवी बिलांचे चंद्रपूर मनपा करणार ऑडिट

Next
ठळक मुद्दे१७ सदस्यांची नियुक्तीशासकीय दरानुसार शुल्क आकारणी बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील काही खासगी रूग्णालयांना कोरोनाबाधित रूग्णांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. त्यासाठी शुल्क निर्धारण केले. मात्र निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त शुल्क व्यतिरिक्त खासगी रूग्णालये अवाजवी शुल्ककोरोना रूग्णांकडून वसूल करीत आहे. याला आळा घालण्यासाठी चंद्रपूर महानगर पालिका प्रशासनाने राज्य वित्त व लेखा सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. कोरोना बाधित रूग्णांवर खासगी रूग्णालयात उपचार झाल्यावर रूग्णांची देयके ही महानगर पालिका प्रशासनाने नेमलेल्या ऑडिटरद्वारे प्रमाणीत करून घेतल्याशिवाय अंतिम होणार नाही. प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे प्रत्येक खासगी रूग्णालयाला बंधनकारक आहे. संबंधीत रूग्णालयाने याबाबत कुचराई केल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महापौर राखी कंचलार्वार व आयुक्त राजेश मोहिते यांनी दिली.

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
राज्य शासन आदेशान्वये निर्धारित केलेल्या दरानुसार खासगी रूग्णालयांनी शुल्क आकारणी करणे गरजेचे आहे. खासगी रूग्णालयांमध्ये सरकारी दरानुसारच शुल्क आकारणी होते किंवा नाही, याची खात्री करण्यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक विभागातील प्रत्येकी २ अधिकारी याप्रमाणे १७ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेव्यतिरिक्त जर बिल रकमेत तफावत आढळली किंवा रूग्णांकडून अवाजवी रक्कम घेतली असल्याचे आढळल्यास त्या रूग्णालयावर कारवाई करण्यात येणार आहे. यातून रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आह

Web Title: Chandrapur Municipal Corporation will audit the exorbitant bills of private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.