‘चंद्रपूर पोलीस’ अपडेटच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:31 AM2021-09-06T04:31:43+5:302021-09-06T04:31:43+5:30

चंद्रपूर : मागील पंधरवड्यापूर्वी जिल्ह्यातील ठाणेदार व सहायक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे ‘सदैव तत्पर, आपल्यासोबत, आपल्यासाठी’ ...

‘Chandrapur Police’ is not an update | ‘चंद्रपूर पोलीस’ अपडेटच नाही

‘चंद्रपूर पोलीस’ अपडेटच नाही

Next

चंद्रपूर : मागील पंधरवड्यापूर्वी जिल्ह्यातील ठाणेदार व सहायक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे ‘सदैव तत्पर, आपल्यासोबत, आपल्यासाठी’ हे ब्रिद जोपासणाऱ्या चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाची ‘चंद्रपूर पोलीस’ ही साईट अपडेट करून त्यामध्ये नवनियुक्त अधिकारी व त्यांचे नंबर नोंद करणे गरजेचे होते. मात्र पंधरवड्याचा कालावधी होत असतानाही पोलीस विभागाची ही साइट अपडेट करण्यात आली नाही. या साइटवर अद्यापही तत्कालीन पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक यांचीच नावे व नंबर दिसून येत आहेत. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत संबंधित ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करायचा असेल तर कुणायला करायचा? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.

आपत्कालीन स्थितीत संबंधित ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करता यावा, यासाठी जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने ‘चंद्रपूर पोलीस’ ही साइट तयार करण्यात आली आहे. ‘सदैव तत्पर, आपल्यासोबत, आपल्यासाठी’ असे याचे ब्रिद आहे. या साइटवर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, पोलीस विभागातील सर्व शाखा, सर्व पोलीस स्टेशनमधील ठाणेदार, सहायक पोलीस निरीक्षक यांचे नाव व मोबाइल नंबरची नोंद असते. आपत्कालीन स्थितीत त्या साइटवर जाऊन संबंधित अधिकाऱ्यांचा नंबर शोधून त्यांच्याशी संपर्क करणे सोपे होते. मात्र मागील पंधरवड्यापूर्वी जिल्ह्यातील ठाणेदारांची खांदेपालट करण्यात आली. पडोली, रामनगर, भद्रावती, चिमूर, गडचांदूर, गोंडपिंपरी, भिसी, शेगाव येथील पोलीस निरीक्षकांची बदली झाली. येथे नवे पोलीस निरीक्षक रुजूही झाले आहेत. मात्र अद्यापही ‘चंद्रपूर पोलीस’ ही साइट अपडेट करण्यात आली नसल्याने या साइटवर तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांचेच नाव व नंबर दिसून येत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यास नागरिकांना अडचण जात असल्याने ही साइट अपडेट करण्याची मागणी होत आहे.

बॉक्स

अनेक ठाण्यातील लॅण्डलाइन बंद

चंद्रपूर जिल्ह्यात ११ जिल्हास्तरीय आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच ३४ पोलीस स्टेशन आहेत. मात्र बहुतांश कार्यालयातील लॅण्डलाइन बंद आहे. त्यामुळे जर आपत्कालीन स्थितीत पोलीस विभागाला मदत मागायची असेल तर कुठे संपर्क करायचा? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्यामुळे नादुरस्त लॅण्डलाइन बदलविण्यात यावे किंवा पर्यायी नंबरची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: ‘Chandrapur Police’ is not an update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.