चंद्रपुरात परराज्यातील मुलींकडून देहविक्रीचा गोरखधंदा, दोन महिला अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:59 PM2021-09-26T16:59:24+5:302021-09-26T17:03:30+5:30
चंद्रपूर शहरातील दोन महिला देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. पथकाने चौकशी सुरू केली असता शहरातील गौतमनगर भागात तीन मुली देहविक्रीच्या व्यापारात अडकल्याची बाब पुढे आली. यामुलींची सुटका करून त्यांना स्त्री आधार केंद्र येथे पाठविण्यात आले आहे.
चंद्रपूर : चंद्रपुरातील गौतम नगरात परराज्यातील मुलींकडून देहविक्रीचा गोरखधंदा करणाऱ्या दोन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. कारवाईनंतर देहविक्रीच्या व्यवसायात अडकलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान व तेलंगणा राज्यातील तीन मुलींची सुटका करण्यात आली.
शहरातील गौतमनगर परिसरात अनेक वर्षांपासून देहविक्रीचा व्यवसाय चालतो. या व्यवसायात अनेक महिला व मुलींचा समावेश आहे. राजस्थान, मध्यप्रदेश व तेलंगणा राज्यातील मुलींकडून चंद्रपूर शहरातील दोन महिला देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पथक केले. पथकाने चौकशी सुरू केली असता शहरातील गौतमनगर भागात तीन मुली देहविक्रीच्या व्यापारात अडकल्याची बाब पुढे आली. यामुलींची सुटका करून त्यांना स्त्री आधार केंद्र येथे पाठविण्यात आले आहे. या प्रकरणात त्यांना या व्यापारात ओढण्याऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.
शहरातील अनेक भागात देहविक्री सुरू आहे, याबद्दल अनेक तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आलेल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी यासंदर्भात कारवाई करण्याचे निर्देश पोलीस निरीक्षक खाडे यांना दिले होते. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पो.नि. पुसाटे नियंत्रन कक्षसह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे, पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे, स.फौ.नितीन जाधव, पो. हवा. संजय आतकुलवार, ना. पो. कॉ. सुधीर मत्ते, पो. कॉ. नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, कुंदनसिंग बावरे, प्रांजल झिलपे, रविंद्र पंधरे, म.पो.शि. निराशा तितरे, अपर्णा मानकर यांनी केली.