चंद्रपूर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:29 AM2021-09-25T04:29:48+5:302021-09-25T04:29:48+5:30
चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील रेल्वेविषयक समस्यांबाबत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडल रेल्वे प्रबंधक कार्यालयात बैठक ...
चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील रेल्वेविषयक समस्यांबाबत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडल रेल्वे प्रबंधक कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी मंडल रेल्वे प्रबंधक ऋचा खरे, झेडआरयूसीसीचे सदस्य दामोदर मंत्री, चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीच्या पूनम तिवारी, अनिश दीक्षित, प्रमोद त्रिवेदी, गौतम यादव व रेल्वे अधिकारी उपस्थित होते. रेल्वे मंत्रालयाने सर्व पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र, राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनुमती नाकारली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे अहिर यांनी सांगितले. पुणे, मुंबई, ताडोबा, आनंदवन, सेवाग्राम, नंदीग्राम व हैदराबादमार्गे येणाऱ्या गाड्यांबाबत चर्चा झाली. एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याची परवानगी असल्याने त्या पूर्ववत होत आहेत. चंद्रपूर स्टेशन चांदा फोर्टला जोडण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तिसऱ्या लाइनचे काम सुरू आहे. बल्लारशाह पिटलाइनचे काम २० ऑक्टोबरपर्यंत, तर मुकुटबन हाल्ट स्टेशनचे काम डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
बॉक्स
रामगिरी पॅसेंजर चंद्रपूरपर्यंत धावणार
रामगिरी पॅसेंजर आता चंद्रपूरपर्यंत धावणार आहे. पुणे-काजीपेठ एक्स्प्रेस सप्ताहात तीन दिवस चालविण्यास मान्यता मिळाली आहे. रामगिरी पॅसेंजरला चंद्रपूरपर्यंत एक्सटेन्शन मिळाले. ती लवकरच सुरू होणार आहे. पुणे गाडीला तीन दिवस चालविण्याची मान्यता असल्याने ती हडपसर (पुणे) येथून बल्लारशाहपर्यंत सुरू करावी. लिंक एक्स्प्रेस बंद केल्याने सेवाग्राम एक्स्प्रेस बल्लारशाहपर्यंत वाढवावी, भाग्यनगरी एक्स्प्रेस कागजनगरपर्यंत, वणी रेल्वे प्लॅटफार्मची लांबी वाढविणे, तसेच कोल साइडिंग हटवून ते कायर येथेे स्थानांतरित करणे व सर्व एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा वणी येथे देण्याची सूचना अहिर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली आहे.