चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक रेल्वे थांबे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 11:22 PM2018-05-07T23:22:41+5:302018-05-07T23:22:51+5:30

लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक रेल्वे थांबे मंजूर झाल्याने प्रवाश्यांना दिलासा मिळाला. रेल्वे प्रवाश्यांच्या सुविधांसाठी सातत्याने आग्रही राहुन प्रस्ताव मंजूर करण्यास ना. हंसराज अहीर यांना यश मिळाले.

Chandrapur sanctioned highest number of rail stops in the Lok Sabha | चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक रेल्वे थांबे मंजूर

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक रेल्वे थांबे मंजूर

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर यांची नवी ओळख : देशात जाण्यासाठी प्रवाश्यांना झाली सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक रेल्वे थांबे मंजूर झाल्याने प्रवाश्यांना दिलासा मिळाला. रेल्वे प्रवाश्यांच्या सुविधांसाठी सातत्याने आग्रही राहुन प्रस्ताव मंजूर करण्यास ना. हंसराज अहीर यांना यश मिळाले. मंत्रिमंडळातील केंद्रीय व राज्यमंत्र्यांपैकी सर्वाधिक रेल्वे गाड्यांचे थांबे मंजूर करवून घेणारे देशातील एकमेव मंत्री म्हणून ना. अहीर यांची ओळख निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात अनेक रेल्वे गाड्या सुरु झाल्या आहेत. सुपरफास्ट गाड्यांचे थांबे चंद्रपूर जिल्ह्यात मंजूर झाल्याने प्रवाश्यांना देशभरात जाण्याची अडचण दूर झाली. मे २०१४ ते मार्च २०१८ पर्यंत चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात ३८ थांब्यांना मंजुरी मिळाली असून रेल्वे गाड्या थांबविल्या जात आहेत.
खासदारकीच्या कार्यकाळापासून जिल्ह्यातील रेल्वे प्रवाश्यांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ना. अहीर सतत प्रयत्नशील राहिले. या प्रयत्नामुळे चंद्रपूरच नव्हे तर यवतमाळ आणि लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांनाही सुविधा उपल्ध झाल्या आहेत. चंद्रपूर व जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट तसेच अन्य रेल्वे गाड्यांचे थांबे नव्हते. त्याठिकाणीही थांबे मंजूर करून रेल्वे प्रवाशांना न्याय दिला आहे. कार्यकाळात अनेक नव्या रेल्वे गाड्या सुरू करून चंद्रपूर, यवतमाळ तसेच गडचिरोली या जिल्ह्यातील विद्यार्थी, व्यवसायिक, उद्योजक व नागरिकांना मोठी पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. या लोकोपयोगी कार्यामुळे प्रवाश्यांसोबतच रेल्वे सुविधा संघर्ष समिती, रेलयात्री संघटनेने समाधान व्यक्त केले. काझीपेठ ते पुणे ही सुपरफास्ट साप्ताहिक गाडी सुरू करण्यासाठीही ना. अहीर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे ही गाडी सुरू होऊ शकली. बल्लारपूर, चंद्रपुरातून पुणे शहरात जाण्याची संख्या वाढतच आहे. विशेषत: पुणे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही नवी गाडी उपयुक्त ठरली. मात्र, गाडीला डब्बे कमी असल्याने अनेक प्रवाशांना संकटांचा सामना करावा करावा लागत होता. दरम्यान, नुकतीच रेल्वे डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी सेवाग्राम एक्स्प्रेसलासुद्धा त्यांच्याच प्रयत्नांने वातानुकूलित डब्ब्यांची सुविधा उपलब्ध झाली होती. ना. अहीर चंद्रपूर आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यात अनेक स्थानकांवर रेल्वे थांबा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत असून काही थांबे सुरू होणार आहे.

Web Title: Chandrapur sanctioned highest number of rail stops in the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.