चांदापासून बांदापर्यंत चंद्रपूरचा पहिला क्रमांक असावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 11:45 PM2018-07-09T23:45:21+5:302018-07-09T23:45:56+5:30

चांदापासून बांदापर्यंत महाराष्ट्राचा नामोल्लेख होतो. त्यामुळे योजना कोणतीही असो, उपक्रम कोणताही असो, चंद्रपूर जिल्हा पहिला असला पाहिजे. चंद्रपूरच्या हॅलो चांदा या पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेने, चंद्रपूर व बल्लारपूरच्या रेल्वे स्थानकाने, एव्हरेस्ट सर करणाऱ्या आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीने आपले उपक्रम, आपल्या योजना, आपल्या पायाभूत सुविधा, कायम अव्वल आणि वेगळेपणाचे असल्याची पायाभरणी केली आहे.

Chandrapur should be the first number from Chandra to Bandra | चांदापासून बांदापर्यंत चंद्रपूरचा पहिला क्रमांक असावा

चांदापासून बांदापर्यंत चंद्रपूरचा पहिला क्रमांक असावा

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : नियोजन भवनात विविध उपक्रमांचा आढावा व कौतुक सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चांदापासून बांदापर्यंत महाराष्ट्राचा नामोल्लेख होतो. त्यामुळे योजना कोणतीही असो, उपक्रम कोणताही असो, चंद्रपूर जिल्हा पहिला असला पाहिजे. चंद्रपूरच्या हॅलो चांदा या पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेने, चंद्रपूर व बल्लारपूरच्या रेल्वे स्थानकाने, एव्हरेस्ट सर करणाऱ्या आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीने आपले उपक्रम, आपल्या योजना, आपल्या पायाभूत सुविधा, कायम अव्वल आणि वेगळेपणाचे असल्याची पायाभरणी केली आहे. त्यामुळे येणाºया काळातही चांदापासून बांदापर्यंत कोणत्याही क्षेत्रात आमचा पहिला क्रमांक असला पाहिजे यासाठी तयार रहा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी जिल्हाधिकारी सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी राज्य शासन राबवित असलेल्या अटल विश्वकर्मा सन्मान योजना, दारिद्र रेषेखालील सर्व नागरिकांना मिशन दिनदयाल योजनेंतर्गत स्वस्त धान्य २ रुपये व ३ रुपये दराने वाटप करणे, जिल्ह्यात पाणी पातळी वाढविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्पातील कमी खर्चाचा प्रकल्प राबविणे, प्रशासनात अफलातून आयडीया देणाºया नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या खोज स्पर्धेचे बक्षीस वितरण व जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या अभिनव प्रकल्पाच्या घडीपुस्तिकांचे विमोचन, लोकप्रिय हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेच्या नव्या संक्षिप्त क्रमांकाचे लोकार्पणाचा कार्यक्रम रविवारी पार पडला.
यावेळी मंचावर आ. नाना श्यामकुळे, आ. अ‍ॅड. संजय धोटे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, उपमहापौर अनिल फुलझेले, सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषद सभापती ब्रिजभुषण पाझारे, गोदावरी केंद्रे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, वरोराचे नगराध्यक्ष अहेतेशाम अली, मूलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, माजी आमदार अतुल देशकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे यांच्यासह विविध नगरपालिकेचे पदाधिकारी व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सीएमफेलो प्रियंका पारले यांनी केले.
प्रास्ताविक जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी तर आभार जिल्हा नियोजन अधिकारी जी. आर. वायाळ यांनी मानले. यावेळी बहुसंख्य कर्मचाºयांची उपस्थिती होती.

भन्नाट ‘आयडीया’ देणाऱ्या खोज स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस देऊन गौरव
जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘खोज’ अर्थात ‘शोध नाविण्याचा’ या स्पर्धेतील विजेत्यांना रविवारी रोख पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. पुरस्कार वितरणापूर्वी या अभिनव योजनेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यतच्या प्रवासाचा आढावा घेणाºया खोज या घडीपुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी कृषीक्षेत्रातून हबीब महेबुब शेख, मधुकर चिंदूजी भलमे हे विजेते ठरले. तर सविता रामविजय गड्डमवार, सुहास दामोधर आसेकर व चमू उपविजेते ठरले. प्रशासनानातील सुधारणा विषयात अश्रयकुमार पुरुषोत्तम गांधी, पर्यटन विषयात प्रवीण कावेरी, नितीन बारेकर व मुक्ताई मंडळाची चमू विजेती ठरली तर राजेंद्रसिंह हरीहरसिंह गौतम, प्रिंयका भालवे हे उपविजेते ठरले. मानवविकास गटात अंबुजा सिमेंट फॉऊडेशन विजेते तर डॉ. बालमुकूल पालीवार व चमू उपविजेते ठरले.
‘हॅलो चांदा’ आता १५५-३९८ नव्या क्रमांकासह सेवेत
गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये हॅलो चंदा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे जिल्ह्यामध्ये उद्घाटन करण्यात आले होते. हॅलो चांदाच्या पहिला प्रयोग महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात आला. ‘पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा’ असे या योजनेला नाव देण्यात आले. जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना आपल्या विविध विषयांच्या संदर्भात तक्रारी करायचे असल्यास त्यासाठी त्यांना एक टोल फ्री क्रमांक देण्यात आला होता. मात्र आता हा क्रमांक बदलला असून नवीन संक्षिप्त टोल फ्री क्रमांकाची सुरुवात करण्यात आली आहे. आता हॅलो चांदा हा क्रमांक १५५-३९८ असा केवळ सहा अक्षरी क्रमांक झाला आहे. यापूर्वी १८००२६६४४०१ असा हॅलो चांदा हेल्पलाईनचा क्रमांक होता. गेल्या वर्षभरात या यंत्रणेच्यामार्फत ६ हजार नागरिकांच्या समस्या सोडवण्यात आल्या होत्या. आज या नव्या क्रमांकाच्या पोस्टरचे यावेळी विमोचन करण्यात आले.
विविध घडीपुस्तिकेचे प्रकाशन
कार्यक्रमादरम्यान वेगवेगळ्या घडीपुस्तकांचे विमोचन करण्यात आले. यामध्ये पोक्सो कायद्यांतर्गत बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमावर आधारित ‘चपळ चांगुल चंद्रपूर’, महिलांच्या मासिक पाळी संगोपन प्रकल्पाअंतर्गत जनजागरणासाठी तयार करण्यात आलेल्या ‘स्त्रीषु’, सामाजिक क्षेत्रामध्ये आपले नाव लौकिक ठेवणाºया वरोºयाच्या महारोगी सेवा समिती आनंदवन व टाटा ट्रस्ट यांच्या मदतीने जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रकल्प राबविला, या घडीपुस्तिकेचे तसेच ‘योजना हक्काच्या, वाटा विकासाच्या, मुद्रा या योजनेचे ‘हक्काचे कर्ज, हक्काचा व्यवसाय’ या घडीपुस्तिकेचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

Web Title: Chandrapur should be the first number from Chandra to Bandra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.