Chandrapur: सिद्धबली इस्पात कामगारांना मिळणार थकीत वेतन 

By राजेश मडावी | Published: August 26, 2023 06:14 PM2023-08-26T18:14:46+5:302023-08-26T18:17:24+5:30

Chandrapur: सिद्धबली इस्पात आरसीसीपीएल (परसोडा लाईमस्टोन) खाणीतील कामगारांचे वेतन थकीत होते. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने शुक्रवारी (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कामगारांना थकीत वेतन देण्याचे निर्देश जारी केले.

Chandrapur: Siddhabali steel workers will get their arrears | Chandrapur: सिद्धबली इस्पात कामगारांना मिळणार थकीत वेतन 

Chandrapur: सिद्धबली इस्पात कामगारांना मिळणार थकीत वेतन 

googlenewsNext

- राजेश मडावी
चंद्रपूऱ - सिद्धबली इस्पात आरसीसीपीएल (परसोडा लाईमस्टोन) खाणीतील कामगारांचे वेतन थकीत होते. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने शुक्रवारी (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कामगारांना थकीत वेतन देण्याचे निर्देश जारी केले. सिद्धबली कंपनी बंद अडीच वर्षांपूर्वी बंद झाली.

कोळसा खाण आदी विषयाशी निगडीत विविध प्रश्नांबाबत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, पोलिस निरीक्षक  शिवाजी कदम, तहसीलदार विजय पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे बिपीन भंडारे, यु.बी. भडूले, एमआयडीसीचे श्रीकांत जोरावर, गोपाल भिराख, राजु घरोटे, विनोद खेवले, विजय आगरे, ॲड. प्रशांत घरोटे उपस्थित होते.

सिद्धबली ईस्पात कंपनीमध्ये अन्य मागासवर्गीय तसेच व इतर प्रवर्गातील कार्यरत पूर्व कामगारांना पूर्ववत रोजगार देऊन त्यांचे थकीत वेतन अदा करण्याबाबत चर्चा झाली. आरसीसीपीएल कंपनीद्वारा परसोडा लीज क्षेत्रातील जमिनीचे एलएआरआर ॲक्ट २०१५ नुसार अधिग्रहणासाठी नोटीफीकेशन काढण्याचे निर्देश आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी जिल्हा प्रशासनास दिले. दुर्घटनेमुळे कंपनीत कामगारांचा बळी गेल्याने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल आयोगाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले. 

Web Title: Chandrapur: Siddhabali steel workers will get their arrears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.