चंद्रपूरचे विद्यार्थी राज्यात चमकले
By admin | Published: July 24, 2015 12:58 AM2015-07-24T00:58:44+5:302015-07-24T00:58:44+5:30
स्टूडेंट आॅलम्पिक असोशिएशन, महाराष्ट्र या संघटनेमार्फत आयोजित राज्यस्तरीय मार्शल आर्ट स्पर्धेत सोलापूर क्रीडा संकुल येथे कराटे, तायकांडो, ...
चंद्रपूर : स्टूडेंट आॅलम्पिक असोशिएशन, महाराष्ट्र या संघटनेमार्फत आयोजित राज्यस्तरीय मार्शल आर्ट स्पर्धेत सोलापूर क्रीडा संकुल येथे कराटे, तायकांडो, जोमासार बुशु, किक बॉक्सींग आदी मार्शल आर्ट खेळ प्रकार पार पडले. या स्पर्धेमध्ये राज्यातून ५०० विद्यार्थी सहभाग घेतला असून चंद्रपूर जिल्ह्याच्या ११ विद्यार्र्थ्याना पदके मिळविण्यात यश प्राप्त झाले.
यात कराटे या खेळ प्रकारात वयोगट १२ हरीष लिमजे, २९ किलो वजन गटात सुवर्ण आकाश चोखारे, २७ वजन गटात सुवर्ण प्रार्थ पाटील, ३० किलो गटात सुवर्ण दीपक निखारे, १७ वयोगटात ५१ किलो सुवर्ण, प्रांजल बोरडे १४ वर्ष वयोगट ४५ किलो गटातून सुवर्ण, नेहा भसारकर १९ वर्ष वयोगट ४५ किलो गटातून सुवर्ण, यासोबतच तायकांडो खेळ प्रकारात, प्रांगल बोरडे सुवर्ण तर वुशुमध्ये श्वेतम बुगावार सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. त्याचप्रमाणे वय १२ वर्ष अथर्व गुडमवार रोप्य, तसेच कुंदनलाल साहू, ३९ किलो रौप्य, कराटे या खेळ प्रकारात मानकरी ठरले. तसेच वुशु या प्रकारात आनंद चोखारे वय १७, ४५ किलो गटात रौप्य कुंदनलाल साहू रौप्य पदक पटकाविण्यात यशस्वी ठरले. सदर विद्यार्थी वेगवेगळ्या शाळेचे असून जिल्हा क्रीडा संकुल, आझाद गार्डन, तालुका क्रीडा संकुल गोंडपिपरी येथील संतोष कडपेवाले, स्वप्नील बंसोड यांच्याकडून मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेत आहेत. (शहर प्रतिनिधी)