Chandrapur: चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती व माणिकगड किल्ल्याचे पूजन, संरक्षण करण्याची घेतली शपथ
By साईनाथ कुचनकार | Published: February 25, 2024 02:35 PM2024-02-25T14:35:31+5:302024-02-25T14:35:43+5:30
Chandrapur: फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या रविवारी राज्यातील विविध गडकिल्ल्यांवर गड-दुर्गप्रेमी एकत्रित येत किल्ल्याचे पूजन करतात. या दिवसाचे निमित्त साधून 'इको-प्रो'च्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या किल्ल्यांवर जाऊन रविवारी एकाच दिवशी गड पूजन केले.
- साईनाथ कुचनकार
चंद्रपूर - फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या रविवारी राज्यातील विविध गडकिल्ल्यांवर गड-दुर्गप्रेमी एकत्रित येत किल्ल्याचे पूजन करतात. या दिवसाचे निमित्त साधून 'इको-प्रो'च्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या किल्ल्यांवर जाऊन रविवारी एकाच दिवशी गड पूजन केले. दरम्यान, पार्थना करीत गडकिल्ल्यांचे पूजन, संरक्षण करण्याची शपथ घेतली.
इको-प्रोच्या वतीने चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आता किल्ला पर्यटन 'चंद्रपूर हेरिटेज वॉक' सुरू झाले आहे. सोबतच विविध गड-किल्ले संवर्धनाकरिता प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती व माणिकगड किल्ल्यांवर पूजन करण्यात आले. चंद्रपूर येथील परकोट किल्ल्यावर पठाणपुरा गेटवर बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात योजना धोतरे, अब्दुल जावेद, सौरभ शेटे, विनोद दुधनकर, सचिन धोतरे, धर्मेंद्र लुनावत, कपिल चौधरी, तर बल्लारपूर येथील किल्ल्यावर अभय अमृतकर, मनीष गावंडे, मनीषा जैस्वाल आणि भद्रावती येथील किल्ल्यावर भद्रावती इको-प्रो सदस्य अमोल दौलतकर, किशोर खंडाळकर, हनुमान घोटेकर, दीपक कावटे, राहुल सपकाळ, कुंदन चौधरी, दीपेश गुरनुले व माणिकगड किल्ल्यावर सुनील लिपटे, सुधीर देव, राजू काहिलकर, संजय सब्बनवार आदींनी पूजन केले.
अशी घेतली शपथ
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी सर्व गड-दुर्गप्रेमी किल्ल्यांवर एकत्रित येत पूजन आणि पार्थना करतात. "हे किल्लास्वरूपी देवतांनो, त्याकाळी तुम्ही आमचे रक्षण केले, आता वेळ आली आहे की, आम्ही तुझे संरक्षण करण्याची, ते आम्ही केले पाहिजे. जेथे-जेथे संवर्धन कार्य सुरू आहे, तेथे अशी कोणतीही दुर्घटना घडू देऊ नकोस, की ज्यामुळे हे संवर्धन कार्य खंडित होईल, संवर्धन कार्य, दुर्ग पर्यटन करणाऱ्यांना सुख, शांती, समृद्धी दे. त्याच्या आरोग्याची काळजी घे. हीच तुझ्या चरणी माझी प्रार्थना.