विभागीय क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:33 PM2018-01-12T23:33:37+5:302018-01-12T23:34:14+5:30
नागपूर भूमी अभिलेख विभागामार्फत प्रदेश कर्मचारी कल्याणकारी निधी, नागपूरद्वारा आयोजित विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत चंद्रपुरातील संघाने अव्वल क्रमांक पटकाविले.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : नागपूर भूमी अभिलेख विभागामार्फत प्रदेश कर्मचारी कल्याणकारी निधी, नागपूरद्वारा आयोजित विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत चंद्रपुरातील संघाने अव्वल क्रमांक पटकाविले. ही स्पर्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे क्रीडा प्रांगणात नागपूर येथे विभागीय भूमी अभिलेख उपसंचालक बाळासाहेब काळे यांच्या मार्गदर्शनात पार पडली.
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील चमंूनी विविध क्रीडा प्रकारातील स्पर्धेत भाग घेतला होता. सांस्कृतिक क्रीडा प्रकारात सोलो गायन, युगल गायन, समूह नृत्य, नाटक व दिग्दर्शक प्रकारात चंद्रपूर जिल्ह्याने विजेतेपद पटकावून क्रीडा स्पर्धेचा पुरस्कार मिळविला. चंद्रपूर जिल्ह्यातील चमूने सांघिक क्रीडा प्रकारात खो-खो महिला व पुरुष, व्हॉलीबॉल व सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तर क्रिकेट व थ्रो बॉल क्रीडा प्रकारात उपविजेतेपद पटकाविले.
वैयक्तिक क्रीडा प्रकारात १०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर धावण्यामध्ये सुमीत किन्नाके व सतीश येनुगवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. महिला ४०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात अनुराधा काकडे यांनी प्रथम क्रमांक आणि धाव स्पर्धेतही प्रथम पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्याच्या चमूने मिळविला.
बॅडमिंटल एकेरी महिला व पुरुष गटात अनुक्रमे मिलिंद राघोते व अनुराधा काकडे यांनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्याचे वर्चस्व सिद्ध केले. बॅडमिंटन दुहेरी पुरुष गटात मिलिंद राघोर्ते व सतीश येनुगवार यांनी प्रथम पारितोषिक पटकावून त्यात मोलाची भर घातली. गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, तीन किमी चालणे महिला गटातदेखील प्रथम पारितोषिक पटकावून जिल्ह्यातील क्रीडापटूंनी विभागात वर्चस्व सिद्ध केले.
जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अभय जोशी यांनी देखील ४५ वर्षे वयोगटात गोळाफेक व तीन किमी चालणे प्रकारात भाग घेऊन द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून जिल्ह्यातील क्रीडापटूंना प्रेरणा दिली. अभय जोशी व अधिनस्त सर्व उपअधीक्षक भूमी अभिलेख तसेच जिल्हा अधीक्षक भमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धेत विभागीय जनरल चॅम्पियशिप प्राप्त केले. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलील, भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक अभय जोशी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.