चंद्रपूर : कोरोना नियमांचे उल्लंघन; मनपाची नऊ प्रतिष्ठानांवर कारवाई; ६८ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 03:57 PM2021-05-21T15:57:19+5:302021-05-21T15:57:27+5:30

मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार झोन क्र. २ चे सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, मुख्य स्वच्छता निरीक्षक भुपेश गोठे, विवेक पोतनुरवार आदी आपल्या २ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

Chandrapur Violation of Corona Rules Corporation's action against nine establishments | चंद्रपूर : कोरोना नियमांचे उल्लंघन; मनपाची नऊ प्रतिष्ठानांवर कारवाई; ६८ हजारांचा दंड वसूल

चंद्रपूर : कोरोना नियमांचे उल्लंघन; मनपाची नऊ प्रतिष्ठानांवर कारवाई; ६८ हजारांचा दंड वसूल

Next

चंद्रपूर : महानगरपालिका हद्दीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरीसुद्धा काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी मनपाने चंद्रपूर शहरातील झोन क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या नऊ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ६९ हजारांचा दंड वसूल केला.

मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार झोन क्र. २ चे सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, मुख्य स्वच्छता निरीक्षक भुपेश गोठे, विवेक पोतनुरवार आदी आपल्या २ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

यांच्यावर कारवाई
लक्ष्मी ऑटो १५ हजार रु., एसजी हार्डवेअर १५ हजार, राकेश गणवीर १५ हजार, हाजी दादा हासम चिनी ५ हजार, गुरुनानक एजन्सी ५ हजार, क्रिशन अग्रवाल ५ हजार, ब्रम्हानी ट्रेडस ३ हजार, संदीप वैरागडे ३ हजार, हरिक्रिशन फिंगर कारखाना २ हजार, असा एकूण ६९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
 
Web Title: Chandrapur Violation of Corona Rules Corporation's action against nine establishments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.