चंद्रपूर जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष रितिका ढवस यांच्यावर दारू विक्रेत्यांचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 11:31 AM2021-02-01T11:31:05+5:302021-02-01T11:31:36+5:30
Chandrapur News दारू विक्रेत्यांनी चक्क जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका महिला अध्यक्ष रितिका ढवस यांच्यासह कुटुंबावर ८-१० दारू विक्रेत्यांनी हल्ला केला.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रजासत्ताक दिनी कोरपना तालुक्यातील नांदा फाटा येथील मटण मार्केट येथे वॉर्डात राहणाऱ्या महिलांनी पाच पेट्या दारू पकडली होती. सदर घटनेचा वचपा काढण्यासाठी दारू विक्रेत्यांनी चक्क जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका महिला अध्यक्ष रितिका ढवस यांच्यासह कुटुंबावर ८-१० दारू विक्रेत्यांनी हल्ला केला.
नांदाफाटा येथील काही महिला व पुरुषांनी गडचांदूर-आवारपूर रस्त्यावर चक्काजाम केला असून वाहनांची रीघ लागली आहे. घटनेमुळे परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांची दहशत पसरली आहे