अवैध दारूविक्रीविरोधात चंद्रपुरात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:00 AM2018-02-20T00:00:41+5:302018-02-20T00:01:09+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात शासनाने दारूबंदी लागू केली. दारूबंदीनंतरच्या पहिल्या तीन महिन्यात दारूबंदीची कडक अंमलबजावणी झाली. मात्र त्यानंतर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात शासनाने दारूबंदी लागू केली. दारूबंदीनंतरच्या पहिल्या तीन महिन्यात दारूबंदीची कडक अंमलबजावणी झाली. मात्र त्यानंतर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. आता सर्रास अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे या विरोधात श्रमिक एल्गारच्या वतीने सोमवारी चंद्रपुरात मोर्चा काढून जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय, अशा गगनभेदी घोषणा देत मोर्चेकरी शहरातील प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. जिल्यात दारूबंदीनंतर कायद्यात बदल करणे आवश्यक होते. मात्र त्यात कोणतेही बदल करण्यात आले नाही. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे फावत आहे, असे श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अॅड. पारोमिता गोस्वामी यावेळी मोर्चेकरांना संबोधित करताना म्हणाल्या. मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.