चंद्रपुरातील पत्रकारिता महाराष्ट्राचा गौरवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:48 PM2018-10-14T22:48:30+5:302018-10-14T22:48:57+5:30
प्रगत व सृजनशील समाज घडविण्यास पत्रकारितेचा मोलाचा वाटा आहे. पत्रकारांच्या लेखणीतून सशक्त समाज पर्यायाने देश घडू शकतो. चंद्रपूर जिल्हा क्षमताधिष्ठीत आहे. त्यामुळे या चंद्रपुरातील पत्रकारिता ही महाराष्ट्राचा गौरव उंचाविणारी ठरेल, असे प्रतिपादन वित्त,नियोजन व वने जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर : प्रगत व सृजनशील समाज घडविण्यास पत्रकारितेचा मोलाचा वाटा आहे. पत्रकारांच्या लेखणीतून सशक्त समाज पर्यायाने देश घडू शकतो. चंद्रपूर जिल्हा क्षमताधिष्ठीत आहे. त्यामुळे या चंद्रपुरातील पत्रकारिता ही महाराष्ट्राचा गौरव उंचाविणारी ठरेल, असे प्रतिपादन वित्त,नियोजन व वने जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर प्रेस क्लबचे उदघाटन रविवारी पार पडले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर ,ज्येष्ठ पत्रकार श्याम पेठकर आणि सत्कारमृूर्ती ज्येष्ठ काष्ठ शिल्पकार,व्यंग चित्रकार मनोहर सप्रे आणि चंद्रपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय तायडे यांची उपस्थिती होती. यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, ना. सुधीर मुनगंटीवार व ज्येष्ठ पत्रकार शाम पेठकर यांच्या हस्ते व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांना चंद्रपूर गौरवने सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लेखणीचा वापर समाजहित व देशहितासाठी झाला पाहिजे, असे सांगितले. प्रास्ताविक संजय तायडे, संचालन संजय रामगिरवार तर आभार प्रमोद उंदिरवाडे यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
सप्रेंनी मानले आभार
सत्कारमूर्ती कास्टशिल्पकार तथा व्यंग चित्रकार मनोहर सप्रे म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. येथील वनावर आधारित उद्योगाचा कालपर्यंत प्रयत्न झाला नाही.परंतु वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथमच येथील बांबूवर आधारित उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याने येथील आदिवासींना रोजगार मिळाला. यासाठी ना.मुनगंटीवार यांचे त्यांनी आभार मानले.