चंद्रपूरकरांना आवडतात ११११, ५५५५, ७७७७ नंबर; फॅन्सी नंबरसाठी मोजतात ७० हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:18 AM2021-06-30T04:18:29+5:302021-06-30T04:18:29+5:30

चंद्रपूर : आपल्या दुचाकी किंवा चारचाकीला आपल्या पसंतीचा नंबर असावा, या इच्छेपोटी अनेकजण वाट्टेल ती किंमत मोजण्यासाठी तयार असतात. ...

Chandrapurkar likes numbers 1111, 5555, 7777; 70,000 for fancy numbers | चंद्रपूरकरांना आवडतात ११११, ५५५५, ७७७७ नंबर; फॅन्सी नंबरसाठी मोजतात ७० हजार

चंद्रपूरकरांना आवडतात ११११, ५५५५, ७७७७ नंबर; फॅन्सी नंबरसाठी मोजतात ७० हजार

Next

चंद्रपूर : आपल्या दुचाकी किंवा चारचाकीला आपल्या पसंतीचा नंबर असावा, या इच्छेपोटी अनेकजण वाट्टेल ती किंमत मोजण्यासाठी तयार असतात. चंद्रपुरातील युवकही याला अपवाद नाही. ११११, ५५५५, ४४४४ नंबर मिळविण्यासाठी अनेकांची चक्क ७० हजार रुपये भरले आहे. अशा फॅन्सी व चॉइस नंबरमधून चंद्रपूर उपप्रादेशिक विभाग मालामाल झाला आहे.

नवे वाहन घेतल्यानंतर वाहनाला आपल्या आवडीचा नंबर मिळावा यासाठी जिल्हाभरातून अनेकजण उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे अर्ज करतात. विशेषत: राजकीय नेते किंवा प्रतिष्ठित व्यक्ती आपल्या वाहनाला पसंतीचा क्रमांक मिळविण्यासाठी आग्रही असतात. अंकशास्त्रावर श्रद्धा असणारे, जन्मतारखेचा अंक, काहीजण लकी मानणारे अंक मिळावे यासाठी प्रयत्नरत असतात. त्यातच मागील काही वर्षांपासून फॅन्सी नंबरचे दर वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे ११११, ५५५५, ४४४४ या क्रमांकासाठी ७० हजार रुपये, ०१२३, ०००५ या क्रमांकासाठी ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम मोजली आहे. यातून सन २०१९-२०२० च्या आर्थिक वर्षातून उपप्रादेशिक विभागाला ५८ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा तर २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात मे पर्यंत ११ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.

बॉक्स

तर नंबरसाठी होतो लिलाव

दुचाकी आणि चारचाकी वाहनाला एकाच विशिष्ट नंबरसाठी अनेक अर्ज आले तर त्यासाठी लिलाव देखील केला जातो. चंद्रपूर जिल्ह्यात विशिष्ट नंबरची मागणी करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने असे प्रसंग क्वचित घडत असतात.

बॉक्स

कोरोना काळात फॅन्सी नंबरची मागणी घटली

कोरोना काळात वाहनांची खरेदी कमी प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे फॅन्सी नंबरची मागणी कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मागील काही वर्षाच्या तुलनेत महसुलामध्ये घट झाली आहे. परंतु, काहीजण फॅन्सी नंबरची मागणी करीत आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात आतापर्यंत ११ लाख ६० हजार रुपये महसूल मिळाला आहे. कोरोनामुळे उत्पन्नात घट पडली आहे.

-----

या तीन नंबरना सर्वाधिक मागणी

११११

०१२३

५५५५

----

या नंबरचे रेट सर्वात जास्त

११११ - ७० हजार रुपये

५५५५ -७० हजार रुपये

०१२३- ७० हजार रुपये

----

२०१९-२०२० ५८ लाख ३५ हजार

२०२१-२०२२ ११ लाख रुपये

-----

कोट

दरवर्षी साधारणत: ६० लाख रुपयांपर्यंत फॅन्सी नंबरमधून उत्पन्न मिळत असते. मात्र कोरोनामुळे यंदा उत्पन्नात घट झाली आहे. सन २०१९-२०२० मध्ये ५८ लाख ३५ हजार रुपये तर २०२१-२०२२ आर्थिक वर्षात मे महिन्यापर्यंत ११ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. यंदाच्या नव्या आर्थिक वर्षापासून बीव्ही ही नवीन सिरीज सुरु करण्यात आली आहे.

किरण मोरे, चंद्रपूर

- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Chandrapurkar likes numbers 1111, 5555, 7777; 70,000 for fancy numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.