४७.७ अंश तापमानाने होरपळले चंद्रपूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:04 AM2018-05-18T00:04:58+5:302018-05-18T00:04:58+5:30
मागील काही दिवसांपासून पुन्हा चंद्रपूरचे तापमान उच्चांक गाठू लागले आहे. मागील दोन दिवसांपासून सूर्याच्या पाऱ्याने ४५ अंश सेल्सीयस पार केले आहे. आज गुरुवारी चंद्रपूरचे तापमान ४७.६ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. या उन्हाळ्यातील आजवरचे हे सर्वाधिक तापमान ठरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून पुन्हा चंद्रपूरचे तापमान उच्चांक गाठू लागले आहे. मागील दोन दिवसांपासून सूर्याच्या पाऱ्याने ४५ अंश सेल्सीयस पार केले आहे. आज गुरुवारी चंद्रपूरचे तापमान ४७.६ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. या उन्हाळ्यातील आजवरचे हे सर्वाधिक तापमान ठरले आहे. या तापमानात शहरात फिरणारे चंद्रपूरकर अक्षरश: होरपळून निघाले.
चंद्रपूरचे तापमान यंदा चांगलेच असह्य करीत आहे. एप्रिल महिन्याच्या दुसºया पंधरवाड्यापासून सूर्याने आग ओकणे सुरू केले. त्याचवेळी पारा ४५ अंशापार गेला होता. अनेक दिवस चंद्रपूरचा पारा राज्यात उच्चांक गाठून होता. मात्र मे महिन्याच्या प्रारंभीच जिल्ह्यात वातावरणात अचानक बदल जाणवू लागला. अनेक भागात वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अशी परिस्थिती चार-पाच वेळा आली. मात्र त्यानंतर आता पुन्हा तापमान वाढू लागले आहे. ४५ अंशापेक्षा अधिक तापमान नोंद होत आहे. मागील पंधरवाड्यात सूर्याच्या पाºयाने ४५, ४६ अंशापर्यंत मजल मारली होती. याच कालावधीत एक दिवस चक्क ४७.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. मात्र आज गुरुवारी तर तापमानाने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. गुरुवारी सकाळी ९ वाजतापासून उन्ह असह्य होत होते. दुपारी १२ वाजतानंतर तर अंगाला अक्षरश: चटके बसत होते. गुरुवारी चंद्रपुरात तब्बल ४७.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. तर ब्रह्मपुरीचे तापमान ४६.७ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले.