चंद्रपूरकरांना २०० युनिट वीज मोफत द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:53 AM2021-03-04T04:53:59+5:302021-03-04T04:53:59+5:30
चंद्रपुरातील जनता प्रदूषणयुक्त वातावरणात राहून राज्याला वीज देण्यासाठी मोठा त्याग करीत आहे. जिल्ह्यात कोळसा खाणी, कागद कारखाना, वीजनिर्मिती केंद्र ...
चंद्रपुरातील जनता प्रदूषणयुक्त वातावरणात राहून राज्याला वीज देण्यासाठी मोठा त्याग करीत आहे. जिल्ह्यात कोळसा खाणी, कागद कारखाना, वीजनिर्मिती केंद्र व सिमेंट कारखाने आहेत. या उद्योगांचाही पर्यटनाच्या दृष्टीने विचार करून औद्योगिक पर्यटन सुरू करण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत, याकडे आमदार जोरगेवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रो संस्थेचे आंदोलन सुरू आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांपासून वेतन नाही. चंद्रपुरातील अमृत पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली नाही. घुग्घुस नगर परिषदेला अर्थसंकल्पात जादा निधी देण्याची मागणीही आमदार जोरगेवार यांनी केली.
बॉक्स
अन् आमदारांना मिळाला लॅपटॉप
कोरोनामुळे अधिवेशनात अंतर राखले जावे, यासाठी काही आमदारांना गॅलरीत बसविण्यात आले. मात्र, आमदारांना लॅपटॉप दिला नाही. त्यामुळे सभागृहातील कामकाज पाहण्यास अडचण येत होती. आमदार किशोर जोरगेवार यांनी याबाबत नाराजी व्यक्त करताच बुधवारी सर्व आमदारांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आला.