बाल विकास मंच व सखी ज्वेलर्सच्या घोषवाक्य स्पर्धेला चंद्रपूरकरांचा प्रचंड प्रतिसाद
By admin | Published: July 31, 2016 01:52 AM2016-07-31T01:52:26+5:302016-07-31T01:52:26+5:30
लोकमत बाल विकास मंच व सखी ज्वेलर्स चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा कल्पकतेला व कला
विजेत्यांना पुरस्कार वितरण : ‘पर्यावरण व स्वच्छता’ या विषयावर घोषवाक्य स्पर्धा
चंद्रपूर : लोकमत बाल विकास मंच व सखी ज्वेलर्स चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा कल्पकतेला व कला गुणांना वाव देण्यासाठी घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘पर्यावरण व स्वच्छता’ या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच बक्षीस वितरण सोहळा स्थानिक ज्युबिली हायस्कूल, चंद्रपूर येथे शनिवारी दुपारी ३ वाजता पार पडला.
या कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्य संग्रामी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला दीप प्रज्ज्वलन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अनेक विद्यार्थी व पालकांनी उपस्थित दर्शवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्युबिली हायस्कूलचे प्राचार्य चंद्रपूर डॉ. उज्जवल टिकाईत होते. तर प्रमुख उपस्थिती आनंद नागरी बँकेचे संचालक व लोकमत वितरक जितेंद्र चोरडिया, रमन बोथरा, लोकमत परिवारातील जेष्ठ सदस्य डॉ.अशोक बोथरा, सखी ज्वेलर्सचे संचालक नीलेश निशाने, लोकमतचे शाखा व्यवस्थापक विनोद बुले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमत जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर यांनी केले.
सर्व विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले . बाल विकास मंच सदस्य नोंदणीसाठी प्रोत्साहित करून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन संयोजिका पूजा ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्युबिली हायस्कूलचे एनसीसी आॅफीसर बारसागडे तथा अमोल कडूकर यांचे अमूल्य सहकार्य लाभले. विजयी स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे आहे.
आंतरशालेय घोषवाक्य स्पर्धा -२०१६
प्रथम- इशिका नंदकिशोर राऊत, चांदा पब्लिक स्कूल चंद्रपूर, द्वितीय - फाल्गुनी मुरलीधर नन्नावरे, सेंट मायकल इंग्लिश स्कूल, चंद्रपूर, तृतीय - आदित्य गणेश भालेराव, सेंट फ्रान्सीस टीएसके स्कूल चंद्रपूर, चवथा - वेदिका संजय सोनुने, पॅरामाऊंट कॉन्व्हेंट, चंद्रपूर, पाचवा - अश्विनी राजू जुनघरे - ज्युबिली हायस्कूल, चंद्रपूर
मातोश्री विद्यालय तुकूम
तनुश्री युवराज खेवले, सलोनी प्रमोद येरगुडे, धनश्री पांडुरंग सावरकर
सेंट फ्रॅन्सिस टीएसके इंग्लिश स्कूल
प्रज्ज्वल विनोद वानखेडे, जानवी नरेश गुरफुडे, पूजा दिलीप निखाडे, तन्वी गोविंद पन्नासे, कामिल के. बेग, आयुष अ. बुरडकर, अमन अजय बुरडकर, संस्कृती राजू बेद्दार, यश किशोर काटकर, कल्याणी नरेश मोगरे, यशस्वी नरेश मोगरे, यश सुरेश खनके
ज्युबिली हायस्कूल, चंद्रपूर
ओम अजय चवरे, प्रथम अनिरुद्ध खोब्रागडे
सेंट मायकल इंग्लिश स्कूल, चंद्रपूर
शुभ्रा श्रावण साखरकर, सृष्टी शितल मेश्राम, साहिल श्रीराम गुरनुले, हर्षित प्रमोद शंभरकर, मनस्वी बुलेश रंगारी
चांदा पब्लिक स्कूल
फरदिन ज. शेख, एजंल सुनार, आयुषी दीपक गडलिंग, सोनिया मनोज कवाडे, विधान कल्याण बडकेलवार
लोककल्याण टिळक कन्या विद्यालय
दीक्षा राकेश कांबळे, ऐश्वर्या अनंत झोडे, साक्षी प्रशांत बोदेले, साक्षी अजय डाखोरे, पायल प्रकाश बानकर, मिताली प्रवेश गर्गेलवार, नम्रता आत्माराम सावंत, कल्याणी किशोर उरकुंदे, माणसी मोतीलाल रासेकर, खुशी सुनील बेतवार,
सेंट आॅन्स हायस्कूल, सुमठाणा
ऐश्वर्या जयंत दरेकर
नारायणा विद्यालयम्, पडोली
अनन्या मकरंद चौधरी
पॅरामाऊनट कॉन्व्हेंट
मृण्मयी संजय सोनुने