हुडहुडी भरवणाऱ्या थंडीला सुरूवात चंद्रपूरचे तापमान १४ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 06:00 AM2019-12-08T06:00:00+5:302019-12-08T06:00:28+5:30
यंदा थंडी जोरदार राहील, अशी नागरिकांमध्ये चर्चा होती. तथापि दिवसाचे तापमान ३० अंशाच्या पुढेच असल्याने सुरूवातीला थंडी जाणवलीच नाही. उलट दिवाळीच्या वेळी पावसाचे थैमान सुरू होते. येणार-येणार म्हणून ज्याची प्रतिक्षा होती. ती थंडी आता कुठे जाणावायला लागली आहे. शुक्रवारी तापमान १४ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत खाली आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात सर्वत्र हुडहुडी भरविणाºया थंडीला प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. वातावरणात गारवा असल्याने वाहणारी हवादेखील बोचऱ्या थंडीची जाणीव करून देत आहे.
यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीपासून लहरी हवामानाने जिल्ह्यावासियांना सतावले. जुलैच्या अखेरीस सुरू झालेला पाऊ स त्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत सतत कोसळत राहिला. एक -एक करीत या कालावधीत जिल्ह्याची पावसाची सरासरी मागील वर्षीच्या तुलनेत वाढली.नदी-नाले दुथडी भरून वाहिली आणि धरणे तुडूंब भरली. त्यानंतर दिवाळीपासून नोव्हेंबर पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाचे थैमान सुरू होते. त्यामुळे यंदा थंडी जोरदार राहील, अशी नागरिकांमध्ये चर्चा होती. तथापि दिवसाचे तापमान ३० अंशाच्या पुढेच असल्याने सुरूवातीला थंडी जाणवलीच नाही. उलट दिवाळीच्या वेळी पावसाचे थैमान सुरू होते. येणार-येणार म्हणून ज्याची प्रतिक्षा होती. ती थंडी आता कुठे जाणावायला लागली आहे. शुक्रवारी तापमान १४ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत खाली आले. दिवसाचे तापमानही ३० अंशावर स्थिरावल्याने दिवसभर हुडहुडी कायम होती. या थंडीला प्रारंभ झाल्याने उबदार कपड्यांची मागणी वाढली आहे. दरम्यान, तिबेटीयन नागरिकही उबदार कपडे घेऊन चंद्रपुरात दाखल झाले आहे.
शेतीला होणार फायदा
यावर्षी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे हातचे सर्वच गेलेल्या शेतकऱ्यांची आशा रबी पिकाकडे आहे. या पिकांना तसेच खरीपातील तूर, कपाशीसाठी थंडीचे वातावरण आवश्यक आहे. या माध्यमातून पिकांत वाढ होईल, अशा आशा शेतकºयांना आहे. दरम्यान गावागावांत शेकोट्याही पेटल्या असून पिकपाण्यासंदर्भात चर्चा केली जात आहे.