देशात चंद्रपूर अव्वल ठरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 10:51 PM2018-10-06T22:51:28+5:302018-10-06T22:51:47+5:30

जिल्ह्यातील युवाशक्तीने भारतातील समृद्ध, विकसित व सर्वदृष्ट्या अग्रेसर असणारा जिल्हा घडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावा. 'मिशन शक्ती' आणि 'मिशन सेवा', या दोन उपक्रमातून भारतातील ७१२ जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्हा सर्वात अव्वल ठरावा, असा आशावाद पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Chandrapur's top decision in the country | देशात चंद्रपूर अव्वल ठरावा

देशात चंद्रपूर अव्वल ठरावा

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील युवाशक्तीने भारतातील समृद्ध, विकसित व सर्वदृष्ट्या अग्रेसर असणारा जिल्हा घडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावा. 'मिशन शक्ती' आणि 'मिशन सेवा', या दोन उपक्रमातून भारतातील ७१२ जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्हा सर्वात अव्वल ठरावा, असा आशावाद पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभूषण पाझारे, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, गोविंद सारडा, रामू तिवारी, अजय मस्के, मोहन कललीवार, आशिष देवतळे आदी उपस्थित होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरच्या नावात आद्याक्षर 'च' आहे. याचा अर्थ कोणत्याही उद्दिष्टांना पूर्ण करावाच लागेल असा आहे. त्यामुळे ध्येय निश्चित करा. यासाठी २४ तासांचे योग्य नियोजन करा. उद्योगपतीचा मुलगा असो अथवा बाबुपेठमधला सामान्य विद्यार्थी असो, मेहनत करण्यासाठी २४ तास प्रत्येकाला मिळतात. त्यामुळे या २४ तासांचा सद्पयोग करणारा यशाला गवसणी घालतो, हे सूत्र कायम लक्षात ठेवा, असेही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
चंद्रपूरमधून आॅलंम्पिकपटू घडविणाऱ्या मिशन शक्ती आणि सनदी अधिकारी घडविणाºया मिशन सेवा या दोन उपक्रमांचे महत्त्व विद्यार्थ्यांपुढे विशद केले.
ज्यांच्यामध्ये उपजत कलागुण व कौशल्य आहे त्यांना मिशन शक्तीच्या माध्यमातून आॅलंम्पिकसाठी जिल्ह्यामध्ये सिद्ध केले जात आहे. मात्र कठोर परिश्रम आणि २४ तासांची योग्य आखणी करणाºया विद्यार्थ्यांसाठी मिशन सेवा हा उपक्रम चंद्रपूरचे नाव अधिक उज्ज्वल करण्यासाठी वाट पाहत आहे. भारतात कुठेही गेलो तरी त्या ठिकाणच्या वरिष्ठ पदावरचा एक मराठी आवाज मला ऐकायला आला पाहिजे की, 'भाऊ मी चंद्रपूरचा आहे ' तो दिवस माझ्यासाठी गौरवाचा असेल. महाराष्ट्रामध्ये आगामी काळात ७२ हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यावेळी प्रत्येकाने कामी लागा. या मेगा भरतीमध्ये चंद्रपूरचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे, असे आवाहनही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केले.
विविध विद्या शाखांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी शहरातील महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.
आदिवासी युवकांच्या ‘मिशन शौर्य’ची आठवण
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ना. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील मिशन शौर्य या उपक्रमाचा संदर्भ दिला. ठासून गुणवत्ता असल्यामुळे संधी मिळाली तर ज्यांनी आयुष्यात विमान पाहिले नाही, असे चंद्रपूरच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थी विमानाएवढ्या उंचीवर असणाऱ्या एव्हरेस्टला गाठू शकले. त्यामुळे अशक्य काही नसते. माझी खात्री आहे की, चंद्रपूरच्या खाणीमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक हिरे आहेत. या हिऱ्यांना फक्त पैलू पाडण्याची गरज आहे. यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर, कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या वाणीतून व्यक्त झालेल्या शिक्षणाच्या महत्त्वाला आयुष्यामध्ये लक्षात ठेवण्याचे आवाहनही केले.

 

Web Title: Chandrapur's top decision in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.