चंद्रपूरचा युगल खोटे राष्ट्रीय स्तरावर
By साईनाथ कुचनकार | Published: March 20, 2024 05:45 PM2024-03-20T17:45:03+5:302024-03-20T17:46:04+5:30
राष्ट्रीय स्तरावर युगल खोटे बॉक्सिंग खेळात प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे विद्यालयातील राष्ट्रीय स्तरावर शाळेचे विद्यार्थी खेळण्यात आणखी भर घातलेली आहे.
चंद्रपूर : अकोला येथे आयोजित सबज्युनिअर बॉक्सिंग राष्ट्रीय स्पर्धेची निवड चाचणी पार पडली. या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातून सेंट मायकल्स इंग्लिश स्कूलचा इयत्ता सातवीमध्ये शिकणारा विद्यार्थी युगल खोटे याने सहभाग घेतला. यामध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून युगलने अंतिम सामना जिंकला. आता तो महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
राष्ट्रीय स्तरावर युगल खोटे बॉक्सिंग खेळात प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे विद्यालयातील राष्ट्रीय स्तरावर शाळेचे विद्यार्थी खेळण्यात आणखी भर घातलेली आहे. चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग क्रीडा मार्गदर्शक विजय ढोबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तो प्रशिक्षण घेत आहे. सतत सराव व योग्य मार्गदर्शन यामुळेच प्रथमच चंद्रपूर जिल्हा राष्ट्रीय स्तरावर युगल खोटेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करणार आहे.
उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय सबज्युनिअर बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत युगल हा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्या यशासाठी प्राचार्य विकास कोल्हेकर, उपप्राचार्य सुधीर सिंग यांनी युगलचे कौतुक केले.