पेपर मिल कामगारांच्या हितासाठी चंडीयज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 10:58 PM2018-12-27T22:58:06+5:302018-12-27T22:58:33+5:30

येथील कागद उद्योग जागतिक स्तरावरचा आहे. १९५० पासून सुरू झालेल्या पेपर मिल उद्योगाने अनेक चढउतार अनुभवले. आर्थिकदृष्ट्या भक्कम पायावर उभे असणाऱ्या उद्योगाला चार वर्र्षांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे जिल्ह्याची अर्थवाहिनी मंदावली आहे. येथील अधिकारी व कर्मचारी चिंताग्रस्त झाले आहेत.

Chandyadian for the benefit of paper mill workers | पेपर मिल कामगारांच्या हितासाठी चंडीयज्ञ

पेपर मिल कामगारांच्या हितासाठी चंडीयज्ञ

Next
ठळक मुद्देनरेश पुगलिया यांची उपस्थिती : विविध मंदिरांमधील पंडित सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : येथील कागद उद्योग जागतिक स्तरावरचा आहे. १९५० पासून सुरू झालेल्या पेपर मिल उद्योगाने अनेक चढउतार अनुभवले. आर्थिकदृष्ट्या भक्कम पायावर उभे असणाऱ्या उद्योगाला चार वर्र्षांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे जिल्ह्याची अर्थवाहिनी मंदावली आहे. येथील अधिकारी व कर्मचारी चिंताग्रस्त झाले आहेत. यातून सावरणे व कामगारांच्या हितासाठी पेपर मिल समोरील श्री गणेश मंदिराच्या प्रांगणात गुरुवारी चंडीयज्ञ करण्यात आला. चंडीयज्ञाच्या माध्यमातून उद्योगाला व कार्यरत कर्मचाºयांच्या जीवनात भरभराटी यावी, अशी मनोकामना व्यक्त करण्यात आली.
यावेळी विजयवाडा येथील महंत पट्टाभिमाचार्य महाराज व देशातील विविध मंदिरातील पंडितांच्या माध्यमातून मंत्रोपचारातून मंगल कामना करण्यात आली. बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष व माजी खासदार नरेश पुगलिया, मुख्य व्यवस्थापक निहार अग्रवाल, पेपर मिलचे व्यवस्थापक व्यंकटेश वरलू, मानव विकास व्यवस्थापक मिलिंद कुळकर्णी, महाव्यवस्थापक प्रवीण साहनी, महाव्यावस्थापक एस.के.जैन, सुरक्षा व्यवस्थापक रमेशचंद्र यादव, चंद्रेश गुप्ता, भूषण आवटे उपस्थित होते.
जिल्ह्याची आर्थिक वाहिनी म्हणून पेपर मिल उद्योगाची ओळख आहे. याच उद्योगाच्या भरोशावर शहराची अर्थ व्यवस्था पुढे सरकते. कार्यरत कर्मचारी वर्ग उल्हासित असतो. मात्र मागील तीन वर्षांपासून उद्योगावर अरिष्ट ओढावले. राज्य सरकारने बांबुसारख्या कच्चा माल देणे बंद केले. परिणामी उद्योग अडचणीत आला. कामगारांचे जीवन अस्थिर झाले. उद्योग व कामगारांचे हित साधावे, याकरिता हा चंडीयज्ञ घेण्यात आला. यज्ञानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी पेपर मिल मजदूर सभेचे तारासिंग कलशी, वसंत मांढरे, रामदास वाग्दरकर, अनिल तुंगीडवार, गजानन दिवसे, वसंत जाधव, राजेंद्र शुक्ला, विरेंद्र आर्य आदी उपस्थित होते.

Web Title: Chandyadian for the benefit of paper mill workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.